हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅलवान व्हॅली स्टँड-ऑफपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्यावर गेलेले आहेत. चीनशी वाढत्या ताणतणावाच्या दरम्यान हा दौरा म्हणजे जुना मित्र असलेल्या रशियाची मदत घेण्याचे धोरण म्हणूनही पाहिले जाते हे उघड आहे. मात्र , रशियाने नुकतेच स्पष्ट केले आहे की भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या वादात ते हस्तक्षेप करू इच्छित नाही. पण या वादानंतर युद्धाच्या बाबतीत रशिया नक्की कोणाच्या बाजूने असू शकेल? हा एक मोठा प्रश्न कायम आहे.
भारत-रशियन संबंधांविषयी काय समज आहेत ?
हे दोन्ही देश जुने मित्र असल्याने असा विश्वास आहे की आपल्या ऐतिहासिक संबंधांच्या जोरावर रशिया कोणत्याही देशाशी संघर्षात भारत अडकल्यास रशिया मदत करेल.मात्र या प्रकारचे समज अपूर्ण आहेत. 2017 मध्ये डोकलाम वादाच्या वेळीही रशियाने तटस्थतेचे धोरण स्वीकारले होते. 1971 च्या पाकिस्तानच्या विरूद्ध युद्धात तर रशियाने भारताला पाठिंबा दर्शविला होता पण 1962च्या चीनविरूद्धच्या युद्धामध्ये नाही.
भारतासाठी रशियाचा पाठिंबा का महत्वाचा आहे ?
चीनविरूद्ध युद्ध झाल्यास रशिया भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध होईल कारण संरक्षण क्षेत्रात हे दोन्ही देश सर्वात मैत्रीपूर्ण राहिले आहेत. भारत विविध प्रकारच्या सैन्य शक्तींसाठी रशियावर अवलंबून आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संरक्षण साहित्यांच्या पुरवठ्यात होणाऱ्या विलंबावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची ही भेट कोविड १९च्या काळात झाली आहे. दुसरीकडे इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार चीनची आडमुठी वृत्ती सोडविण्यात रशिया उपयुक्त ठरू शकतो. यासाठी रशियाला तयार करण्यासाठी भारताला प्रत्येक संभाव्य मार्गाने प्रयत्न करावे लागतील.
चीन आणि रशिया हेदेखील चांगले मित्र आहेत
अलीकडील काळात चीन आणि रशियामधील मैत्रीपूर्ण संबंधही आणखी गहिरे झाले असल्याचे तज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांचा हवाला देऊन युरेशियन टाईम्सने असे लिहिले आहे की, यावेळी चीनविरूद्ध जाणे रशियासाठी एक कठीण पाऊल असेल. का? याची कारणे जाणून घेण्यासारखी आहेत.
रशियाची परिस्थिती यापुढे अनुकूल नाही!
पाकिस्तानपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या रशियाकडे बरीच जमीन आहे. म्हणजेच या देशाने युरोपपासून आशियापर्यंत आपले संरक्षण कसे करावे, याचा विचार केला पाहिजे. विशेषतः अमेरिकेच्या धोक्यात असताना रशिया आपल्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून आहे आणि त्यातील त्याचा मोठा साथीदार चीन आहे. मात्र दुसरीकडे, विनाकारण कोणाबरोब रशियाने शेजार्यांशी संघर्षात अडकण्याचा मार्ग निवडेल ही शक्यता कमीच आहे.
यूटीच्या अहवालात दुसर्या तज्ञाचा हवाला देऊन म्हटले आहे की, आता रशिया एक कमकुवत शक्ती आहे. आर्थिकदृष्ट्या, त्याची हालत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत त्यांना शेजारच्या चीनच्या मदतीची अत्यंत गरज आहे. जर चीन आणि भारत यांच्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर रशिया भारत किंवा चीनला डोळे बंद करून मदत करू शकणार नाही कारण आतापर्यंत जे लोक भारताबरोबर आहेत त्यांच्यामध्ये अमेरिकेचे नाव महत्वाचे आहे आणि रशियाचा अमेरिकेशी थेट संघर्ष आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.