हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या पोलिसांकडून झालेल्या हत्येचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भारतातूनही अनेकांनी या निषेधात सहभाग नोंदवला आहे. सलोनी गौर या कॉमेडियन तरुणीनेही यावर आपल्या प्रतिक्रियांचा एक व्हिडीओ केला आहे. आपल्या हटके अंदाजात तिने ट्रम्प यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. या व्हिडिओत तिने अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना तुम्ही कोरोनाची लस सोडा आणि आधी ट्रम्पचा उपचार शोधा असा टोलाही मारला आहे.
सलोनी गौर ही कॉमेडियन तरुणी नजमा आपी या नावाने व्हिडीओ करत असते. अमेरिकेतील एकूण परिस्थितीवर तिने हा व्हिडीओ केला आहे. ज्यात तिने चांगलेच तोळे लगावले आहेत. ती म्हणते, “भाऊ जर तुम्ही कोणत्या बंकर च्या मागे लपून बसला नसाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की अमेरिकेत काय सुरु आहे. या ट्रम्प पासून आपण आपली गरिबी लपविली होती पण ट्रम्प स्वतःच लपून बसला आहे. मला ट्रम्प ला विचारायचं आहे की जगभरातले मॅटर सोडवायला तू खलिफा होत असतोस आणि आता स्वतःच्या देशात आग लागली तर तुझा विवेका मुणूनडून झाला आहे.”
Kya karna hai fir Trump ka? pic.twitter.com/cnI94N6F1d
— Saloni Gaur (Nazma Aapi) (@salonayyy) June 2, 2020
ती म्हणते, ” तू भारताकडून हायड्रोक्लोरो लस घेतली ठीक आहे, पण मतदानाच्या आधी दंगे करण्याची कल्पना का घेतली? मला जगाचा वंशवाद लक्षात येत नाही की सगळे रंग विधात्याने बनवले आहेत. तुमच्या नादात काय एशियन पेंट च्या शेडकार्डनुसार जन्माला यायचे काय?” काई आंदोलक दुकाने लुटत आहेत त्यांना ती म्हणते तुम्हाला फुकट ब्रँडेड वस्तू हव्या आहेत तर सेलची वाट बघा आंदोलन का खराब करत आहात. या व्हिडिओत तिने प्रियांका चोप्रा आणि इव्हँका या दोन तरुणींचे कौतुक केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.