Lockdown 4.0 | १२ दिवसांत ७० हजार नवीन कोरोनाग्रस्त; १ हजार ६७७ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वेगाने वाढणार्‍या कोरोनाव्हायरसच्या संसर्गाच्या ग्राफने आज सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आतापर्यंत, एकाच दिवसात कधीही ७००० पेक्षा जास्त प्रकरणे दाखल झालेले नाहीत, मात्र गेल्या २४ तासांत ७,४६६ नवीन प्रकरणे नोंदली गेल्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. असे नाही की, कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे फक्त आजच खूप वाढली आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक नोंदले गेले आहे. लॉकडाउनचा सध्या सुरु असलेला चौथा टप्पा संपण्यास अद्यापही दोन दिवस बाकी आहेत. मात्र तरीही गेल्या १२ दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोनाचे सुमारे ७० हजार नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत, तसेच १६७७ लोकांचा मृत्यूही झाला आहे. देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा १८ मे रोजी सुरू झाला. १४ दिवसांच्या या लॉकडाऊनच्या सुरूवातीस, देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ही ९६ हजार १६९ होती, तर ३०२९ लोकांचा मृत्यू झाला होता.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याआधी ३६,८२३ लोक बरे होऊन आपापल्या घरी परत गेले होते, तर त्या दिवशी ५२४२ नवीन प्रकरणे नोंदली गेली. आजच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालावर नजर टाकल्यास सध्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक झालेली दिसते आहे. आज देशात कोरोना विषाणूची ७४६६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर देशात संक्रमित रूग्णांची संख्या १,६५,७९९ वर गेली आहे. आतापर्यंत देशात ४७०६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ७११०५ लोक बरे होऊन घरी गेले आहेत.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला बारा दिवस उलटून गेले. दरम्यान यामध्ये कोरोनाच्या ६९६३० नवीन घटना घडल्या आहेत तर १६७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात, दररोज कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ दिसून आलेली आहे. १८ मे रोजी कोरोनाची ५२४२ प्रकरणे नोंदवली गेली, तर १९ मे रोजी ४९७० प्रकरणे नोंदली गेली. यानंतर २० मे रोजी ५६११ प्रकरणे नोंदविण्यात आली. तर २१ मे रोजी ५६०९ आणि २२ मे रोजी ६०८८ नवीन प्रकरणे समोर आलेली आहेत. २३ मे रोजी कोरोनाची नवीन प्रकरणे ६६५४ ने वाढली तर २४ मे रोजी ६७६७ नवीन प्रकरणे उघडकीस आली. २५ मे रोजी कोरोनाची ६९७७ नवीन प्रकरणे आढळली तर २६ मे रोजी ६५३८ प्रकरणे नोंदली गेली. २७ मे रोजी ६३८७, २८ मे रोजी ६५६६ आणि २९ मे रोजी ७४६६ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

कोरोनामध्ये संक्रमित रूग्णांची संख्या जितक्या वेगाने वाढत आहे, तितकीच कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४७०६ लोकांचा मृत्यू झाला आहे. १८ मे रोजी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी १५७ लोकांचा मृत्यू झाला होता तर १९ मे रोजी १३४ लोकांचा मृत्यू झाला होता. या नंतर २० मे रोजी १४० लोक मरण पावले, २१ मे रोजी १३२ लोक, २२ मे रोजी कोरोनामुळे १४८ लोक मरण पावले. दुसर्‍या दिवशी २३ मे रोजी १४७, २४ मे रोजी १३७ लोक मरण पावले, कोरोनामुळे २५ मे रोजी १५४ लोक मरण पावले तर २६ मे १४६ रोजी २७ मे १७०, २८ रोजी १९४ ,२९ मे रोजी १७४ लोक मरण पावले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.