कोरोनामुक्त झाल्यानंतर MIM च्या नेत्याची जंगी मिरवणूक; २०० जणांवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | माजी नगराध्यक्षने कोरोनावर मात केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी वैजापूर शहरात घडला. या प्रकरणी सुमारे दोनशे जनांवर विविध कलमाखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैजापुरचे माजी नगरअध्यक्ष व एमआयएम चे नेते अखिल शेख यांना कोरोनाची लागण झाली होती, शहरात उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाल्याने रात्री 8 वाजेच्या सुमारास शेख हे वैजापूर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आले असता तेथे अगोदर पासूनच उपस्थित असलेले शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी सुरू केली. आणि तेथून दर्गाबेस येथील शेख यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ही बराच वेळ कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करीत होते.

दरम्यान या वेळी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे ज्या भागात शेख हे राहतात तो भाग कंटेन्मेंट झोन आहे. त्या भागाला सील करण्यात आले आहे. असे असताना देखील सर्व नियम मोडत जमावबंदी आदेश झुगारात ही मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरा या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात शेख यांच्यासह 200 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची बघ्यांची भूमिका…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते दर्गाबेस हा मिरवणुकीचा अंतर सुमारे पाऊण किलोमीटरचा आहे.रस्त्यातच वैजापूर पोलीस ठाणे लागते सर्व आदेश धाब्यावर बसवत मिरवणूक पोलिसादेखत ठाण्यासमोरून गेली मात्र ठाण्यातील एकही अधिकारी- कर्मचऱ्यानि या मिरवणुकीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही.त्या नंतर ही अनेक तास घोषणाबाजी गर्दी होती.

कार्यकर्त्यांनी ब्यारिकेट्स काढून फेकले…
दर्गाबेस परिसर मध्ये मोठ्याप्रमाणात कोरोनाबधित रुग्ण अधल्यानंतवर हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला त्यामुळे परिसराला ब्यारिकेट्स सील करण्यात आले होते. मात्र हे ब्यारिकेट्स शेख यांच्या कार्यकर्त्यांनी काढून फेकले. सकाळी पुन्हा प्रशासनाने ते व्यवस्थित केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment