हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदींनी कोरोना संकटाच्या वेळी देशाला संबोधित करताना 80 कोटी देशवासियांनी खूप चांगली बातमी दिली आहे. यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यात मागील तीन महिन्यांचा खर्च जर आपण जोडला तर तो जवळपास दीड लाख कोटी रुपये होतो.
पंतप्रधान मोदी म्हणाले की,’ मित्रांनो, पावसाळ्यात आणि त्यानंतर मुख्यत: कृषी क्षेत्रात आपल्याकडे अधिक काम आहे. इतर क्षेत्रात थोडीशी मंदी आहे. हळूहळू जुलैपासून सण देखील येण्यास सुरवात होते. या उत्सवांच्या वेळी गरजा वाढतात आणि खर्चही होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊनच असे ठरविण्यात आले आहे की प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळी आणि छठ पूजे पर्यंत म्हणजे नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मध्ये अर्ज कसा करावा, तुम्हाला बरेच फायदे मिळतात
या अंतर्गत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेठी अर्ज कसा करावा, यासाठी ठेवीदाराने पहिले कोणत्याही आरबीआयच्या अधिकृत बँकेत खाते उघडले पाहिजे. यासाठी एक वेगळा फॉर्म आहे जो आरबीआयने दिला आहे. केवळ अघोषित मालमत्ता असलेल्यांनाच हा फॉर्म भरावा लागतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला जवळच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा लागेल. शहरातील उमेदवारास नाव नोंदविण्यासाठी आपल्या नगरपालिकेत जाऊन संपर्क साधावा लागेल.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी अर्ज करण्याची कोणतीही स्वतंत्र अशी प्रक्रिया नाही आहे. वास्तविक, ही योजना सरकारने 2016 मध्येच नोटाबंदीनंतर सुरू केली होती. याअंतर्गत, अघोषित उत्पन्नाची माहिती देणाऱ्यां कडून 50 टक्के कर वसूल करण्याची तरतूद करण्यात आली असून 25 टक्के रक्कम 4 वर्ष सरकारकडे ठेवण्याचा नियम करण्यात आला. ही रक्कम संबंधित व्यक्तीला व्याजाशिवाय 4 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यावर परत करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. सरकारने सांगितले की, या अघोषित उत्पन्नामधून वसूल केलेली रक्कम ही पीएम गरीब कल्याण योजना निधीमध्ये जमा केली जाईल आणि ती रक्कम कल्याणकारी योजनांवर खर्च केली जाईल.
या पीएमजीकेवाय योजनेत सुमारे 80 कोटी लोकांचा समावेश आहे. याअंतर्गत प्रत्येकाला आधीपासून मिळत असलेल्या व्यतिरिक्त आणखीन 5-5 किलो गहू किंवा तांदूळ देण्यात येत आहे. तांदूळ घ्यायचं की गहू हे त्यांच्यावर अवलंबून आहे. कोरोनाच्या संकटामध्ये प्रोटीनचे महत्त्व लक्षात घेता, नोव्हेंबर 2020 मध्ये प्रत्येक घराला त्यांच्या आवडीची 1 किलो डाळही सरकार पुरवेल. पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत. अंदाजे 8.69 कोटी शेतकर्यांना हा त्वरित लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. आता नोव्हेंबर 2020 पर्यंत अपंग, गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवांना 1000 रुपये दिले जातील.
योजना काय आहे
वास्तविक, ही पंतप्रधान गरीब कल्याण योजना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) सारखी आहे. ज्याप्रमाणे आपण मोबाइल पोर्टेबिलिटी मध्ये आपला नंबर न बदलता त्याच नंबरवरून देशभर बोलता. त्याचप्रमाणे, या रेशन कार्ड पोर्टेबिलिटीमध्येही आपले रेशन कार्ड बदलणार नाही. जर आपणास सोप्या भाषेत सांगायचे तर आपण एका राज्यातून दुसर्या राज्यात जाताना आपले हे रेशन कार्ड वापरू शकता. या कार्डद्वारे आता आपल्याला इतर राज्यांमधूनही शासकीय रेशन खरेदी करता येईल.
उदाहरणार्थ समजून घ्या
समजा मोहित कुमार हा यूपीचा रहिवासी आहे आणि त्याचे रेशनकार्डही यूपीचे आहे. या रेशनकार्डच्या माध्यमातून त्याला दिल्ली किंवा इतर कोणत्याही राज्यात सरकारी रेशन वाजवी दरात खरेदी करता येईल. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मर्यादा किंवा नियमांचे बंधन असणार नाही. तो देशातील कोणत्याही राज्यात रेशन विनामूल्य घेऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणतेही नवीन रेशनकार्ड लागणार नाही. याचा अर्थ असा आहे की यासाठी फक्त केवळ आपले जुने रेशनकार्ड वैध असेल.
जुन्या रेशनकार्डचे काय होईल?
‘वन नेशन, वन रेशन’ कार्ड ‘ही योजना लागू झाल्यानंतरही जुने रेशनकार्ड चालूच राहतील, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. हे केवळ नवीन नियमांच्या आधारे अपडेट केले जाईल जेणेकरून ते संपूर्ण देशात वैध असेल. म्हणजेच, यासाठी आपल्याला नवीन रेशन कार्ड तयार करण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्याकडे आधीपासून रेशनकार्ड आहे त्यांना त्याच रेशनकार्डच्या आधारे ‘वन नेशन वन रेशन कार्ड’चा लाभ मिळेल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या
सध्याच्या कोरोना संकटाच्या वेळी मोदी सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण या योजनेंतर्गत 1.70 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या योजनेंतर्गत लॉकडाऊन दरम्यान गरीब आणि असहाय लोकांना मदत केली जाईल. त्याचा उद्देश असा आहे की देशातील कोणत्याही गरीब व्यक्तीने उपाशी राहू नये.
हे पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज सुमारे 1.70 लाख कोटी रुपयांचे आहे. याचा सुमारे 80 कोटी गरजू लोकांना याचा फायदा होत आहे.
आता नोव्हेंबर 2020 पर्यंत महिलांच्या जनधन खात्यात दरमहा 500 रुपये जोडले जातील.
मनरेगा कामगारांचे वेतन 182 रुपयांवरून 202 रुपये केले आहे.
कोरोना संकटाच्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा 50 लाखांचा विमा उतरविला जाईल.
प्रधानमंत्री अन्न योजनेंतर्गत 80 कोटी लाभार्थ्यांना आता नोव्हेंबर 2020 पर्यंत दरमहा अतिरिक्त 5 किलो गहू किंवा तांदूळ मिळणार आहे आणि प्रत्येक कुटुंबाला 1 किलो मसूर डाळही मोफत देण्यात येईल. तसेच, प्रत्येक गरीब कुटुंबाला दरमहा एकूण 25 किलो अन्नधान्य देण्याचे लक्ष्य आहे.
दीनदयाल या योजनेंतर्गत बचत गटांना आता 20 लाखांपर्यंत कर्ज घेता येणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांची मदत दिली जात आहे.
वृद्ध, अपंग आणि विधवांना नोव्हेंबर 2020 पर्यंत 1000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.