मुंबईतून थेट यूपीतील आपल्या गावात पोहोचला नवाजुद्दीन सिद्दीकी; १४ दिवस होम क्वारंटाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना येथे आपल्या घरी पोहोचताच होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तो मुंबईहून नुकताच मुझफ्फरनगरला आला आहे. आता तो आपल्या कुटुंबासमवेत १४ दिवस क्वॉरंटाईन राहील. या अभिनेत्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली गेली आहे. ज्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.

महाराष्ट्र सरकारचे परवानगीपत्र मिळाल्यानंतर नवाजुद्दीन १५ मे रोजी आपल्या घरी पोहोचला. येथे त्याला २५ मे पर्यंत त्याच्या कुटुंबासमवेत क्वॉरंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

घरी जाताना रस्त्यामध्ये २५ वेळा झाली वैद्यकीय तपासणी
मुंबईहून नवाज बुढाना येथे स्वत: च्या कारमधून आला होता आणि या प्रवासात त्याची आई, मेव्हणी व भाऊही त्याच्यासोबत होते. या अभिनेत्याने पत्रकारांना सांगितले की, या प्रवासादरम्यान त्याला रस्त्यात २५ ठिकाणी वैद्यकीय तपासणीतून जावे लागले.

बुढाना पोलिस सर्कलचे स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएसओ) कुशलपाल सिंह यांनी सांगितले की आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी या अभिनेत्याच्या घरी जाऊन त्याला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहाण्यास सांगितले.

देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत
आजपासून देशात लॉकडाउन ४.० सुरू झाले आहे. या लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत चालू राहणार आहे. देशात लॉकडाउन असूनही संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच आहे. गेल्या २४ तासांत देशात संक्रमित रूग्णांची ५२४२ प्रकरणे नोंदली गेली आहेत, जे एका दिवसात आतापर्यँत वाढलेले सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याच वेळी गेल्या २४ तासांत १५७ लोकही मरण पावले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ९६,१६९ लोकांना संसर्ग झाला आहे. तसेच, ३०२९ लोक मरण पावले आहेत. सुमारे ३० हजार ८२४ लोकही यातून बरे झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.