“निवडणुका संपल्याबरोबर केंद्र सरकारकडून जनतेला महागाईचा बुस्टर डोस”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक संपल्या आहेत. निवडणुका संपल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलमध्येही वाढ केली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. “कोरोना महामारीनंतर आधीच आर्थिक ओढाताण सहन करणाऱ्या जनतेला ‘महागाईचा बुस्टर डोस’ केंद्राकडून दिला जात आहे. उदरनिर्वाहाची कसरत करताना लोकांच्या अक्षरश: नाकी नऊ येत आहेत. त्यात ही दरवाढ म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच ठरणार आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यासंदर्भात अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली असून ज्यात म्हंटले आहे की, ’ उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि केंद्र सरकारकडून लगेच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे दर वाढवण्यात आले. आजपासून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे नवीन दर लागू झाले आहेत.

https://www.facebook.com/NCPSpeaks/photos/a.314007098737127/2298856823585468/

ज्यानुसार एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 50 रूपयांची वाढ झाली असून मुंबईत एक घरगुती एलपीजी सिलिंडर आता 950 रूपयांना मिळणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्येसुद्धा 80 पैशांची वाढ झाली असून मुंबईत आजपासून पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 111 रूपये व 95रूपये इतके असतील.

Leave a Comment