चीनी ऍप बंदीवर निक्की हेली यांनी केले भारताचे कौतुक 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत सरकारने ५९ चीनी ऍपवर बंदी घातल्यावर विविध स्तरातून भारताचे कौतुक होते आहे. आता संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनीदेखील आपल्या ट्विटर अकॉउंटवरून भारताचे कौतुक केले आहे. टिकटॉक, युसी ब्राउझर, शेअर इट, ब्युटी प्लस यासारखे ५९ चीनी ऍप बंद केले आहेत. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

‘चीनी कंपनीच्या लोकप्रिय ५९ ऍपवर भारताने बंदी घातलेली पाहून छान वाटले. या ऍपमध्ये भारतातील बाजारपेठांमधील एक मोठे ऍप टिकटॉक याचाही समावेश आहे. चीनच्या आक्रमकतेसमोर भारत झुकणार नाही हे भारताने दाखवून दिले आहे.’ असे त्या आपल्या ट्विटर अकॉउंटवर म्हणाल्या आहेत. ‘चीनमधील कम्युनिस्ट पक्षासाठी सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या या अ‍ॅपवर भारतानं घातलेल्या बंदीचं आम्ही स्वागत करतो. भारताच्या दृष्टीकोनातून या निर्णामुळे सार्वभौमत्वाचं रक्षण होईल,’ असेही त्यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान म्हंटले आहे.

 

चीन भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यावर केंद्र सरकारने या ऍपवर बंदी घातली होती. पंतप्रधान मोदींनी देखील त्यांचे Weibo  वरील अधिकृत अकॉउंट डिलीट करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या निर्णयाचे देशभरातूनही स्वागत होते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment