Tuesday, November 18, 2025
Home Blog Page 1680

…अन् पत्याच्या पानाप्रमाणे कोसळली भाजप नेत्याच्या हॉटेलची इमारत; अवघ्या काही सेकंदात झालं उद्ध्वस्त

Hotel Of BJP Leader Demolished

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखादा भूकंप झाला कि पत्याप्रमाणे इमारती कोसळताना आपण पाहिल्या असतील. पण एका भाजप नेत्यावर कारवाई करत त्याचे अनधिकृत हॉटेल पानाच्या पत्याप्रमाणे पाडण्यात आले आहे. मध्य प्रदेशात भाजपा नेत्याच्या अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून त्याचे हॉटेल पाडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

इंदूरमधील विशेष पथकाने मंगळवारी संध्याकाळी 60 डायनाईटचा वापर करत भाजपाचे निलंबित नेते मिश्री चंद गुप्ता हॉटेल उद्ध्वस्त केले. यानंतर काही सेकंदातच हॉटेल जमीनदोस्त झाले. जिल्हाधिकारी दीपक आर्या, उपमहानिरीक्षक तरुण नायक आणि इतर वरिष्ठ अधिकारी आदींचीही यावेळी उपस्थिती होती.

ज्या भाजप नेत्याच्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली ते अद्यापही बेपत्ता आहेत.
22 डिसेंबरला कोरेगावमधील रहिवासी जगदीश यादव यांची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली. भाजपा नेते मिश्री चंद गुप्ता आणि कुटुंबावर याप्रकरणी आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिश्री चंद गुप्ता अद्यापही बेपत्ता आहेत.

Rishabh Pant Accident : मोठी अपडेट!! पुढील उपचारासाठी पंतला मुंबईला हलवणार

Rishabh Pant Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कार अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंतला (Rishabh Pant Accident) पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम सुंदर यांनी याबाबत माहिती दिली आहे. ३० डिसेंबर रोजी पंतचा अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ थोडक्यात बचावला असून त्याच्या पायाला डोक्याला आणि पाठीला मार लागला आहे.

पंतला पुढील उपचारांसाठी बुधवारी मुंबईला हलवले जाईल. मुंबईत त्याच्या गुडघा (Rishabh Pant Accident) आणि घोट्याच्या दुखापतींवर उपचार केले जातील. पंतच्या गुडघ्याचा लिगामेंट फाटला आहे आणि त्याच्या उजव्या मनगटावर, घोट्याला आणि पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. मुंबईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ऋषभ पंत वर उपचार केले जात आहेत. पंतच्या लिगामेंट उपचाराची जबाबदारी बीसीसीआयने स्वत:वर घेतली आहे. बीसीसीआयने आश्वासन दिले की पंतला या वेदनादायक टप्प्यातून बाहेर येण्यासाठी सर्व वैद्यकीय सेवा आणि सर्व शक्य तेवढी मदत मिळेल.

ऋषभ पंत हा प्रसिद्ध क्रीडा ऑर्थोपेडिक डॉ. दिनशॉ पार्डीवाला यांच्या देखरेखीखाली असेल अशीही माहिती समोर येत आहे. ज्यांना बीसीसीआयच्या यादीत समावेश करण्यात आले आहे. ३० डिसेंबर ला ऋषभ पंतच्या भरधाव गाडीचा अपघात झाला होता. आहे अपघात इतका भीषण होता कि, पंतच्या गाडीला आग लागली. या अपघातात ऋषभ पंत थोडक्यात बचावला.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिला शेवटचा इशारा, लवकरात लवकर करा ‘हे’ काम अन्यथा निष्क्रिय होईल Pan Card

PAN Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Pan Card आणि आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे बनले आहेत. अनेक महत्वाच्या कामांमध्ये याचा वापर अनिवार्य झाला आहे. याबरोबरच अनेक सरकारी योजनांचा लाभ देखिल याशिवाय घेता येणार नाही. मात्र, आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केलेल्यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे. एका ताज्या एडवायझरीनुसार, जर आपले Pan Card  31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होईल. कारण या तारखेनंतर अशा लोकांना आपले पॅन कार्ड वापरता येणार नाही.

How to get a duplicate PAN card online: Simple step-by-step guide

आयटी कायद्यानुसार 31 मार्च 2023 पर्यंत Pan Card आधारशी लिंक न केल्यास ते निष्क्रिय ठरणार आहे. ज्यामुळे 1 एप्रिल 2023 पासून ते कोणत्याही कामासाठी वापरता येणार नाही. इथे हे लक्षात घ्या कि, आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालयातील लोकांना यामधून सूट देण्यात आली आहे. याशिवाय 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही यामधून सूट देण्यात आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 31 मार्च 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची मुदत दिली आहे.

How to link PAN card with Aadhaar number | Deccan Herald

अशा प्रकारे आपले आधार आणि पॅन कार्ड लिंक करा

सर्वात आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जा.
यानंतर पेजच्या डाव्या बाजूला ‘Quick links’ चा पर्याय दिसेल.
‘Link Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.
पॅन, आधार क्रमांक आणि नाव टाका.
ही माहिती दिल्यानंतर एक OTP पाठवला जाईल.
OTP टाकल्यानंतर आधार आणि पॅन लिंक होईल.

PAN Card, Aadhaar Card Linking Deadline Is June 30: How to Check Status,  Link Aadhaar-PAN Online | Technology News

पॅन-आधार लिंक आहे की नाही ते अशा प्रकारे तपासा

http://www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.
शीर्षस्थानी असलेल्या ‘Quick links’ हेडवर जा आणि ‘Link Aadhaar’ वर क्लिक करा.
यानंतर स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल.
या पेजच्या वरच्या बाजूला एक हायपरलिंक असेल ज्यामध्ये असे दिसेल की, आधीच आधार लिंक करण्याची विनंती केली आहे, त्यामुळे स्टेटस जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हायपरलिंकवर क्लिक केल्यानंतर पॅन आणि आधार डिटेल्स एंटर करा.
आता ‘View Link Aadhaar Status’ वर क्लिक करा. यानंतर आपला Pan Card आधारशी लिंक आहे की नाही ते कळेल.

हे पण वाचा :
Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या

जगातील सर्वात पहिलं Kiss कुणी केलं?, कुठून झाली नक्की सुरुवात…

viral Kiss history

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रेम व्यक्त करताना कधी भान विसरून दोन प्रेमिक एकमेकांचे चुंबन घेतात. एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन किस करतात. तसे पाहिले तर प्रेम व्यक्त करण्याचे ते एक प्रकारचे माध्यमच आहे. जगात सर्वात प्रथम पहिलं किस कुणी केली. कोणत्या ठिकाणी किस करण्याचाही पहिल्यादा घटना घडली? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचे नक्की कारण काय? हे आपण जाणून घेऊयात…

आजच्या काळात एखाद्या व्यक्तीने चुंबन घेणे ही जणू प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बनली आहे. विशेषत: ओठांवर चुंबन घेणे हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. जगात सर्वात पहिले चुंबनची सुरुवात फ्रेंच जोडप्यापासून झाली असावी, असे म्हटले जाते. तर किसची सुरुवात भारतातून सुरू झाली आणि त्यानंतर हे जगभर पसरले, असे मत तज्ज्ञांतून व्यक्त केले जात आहे.

जगातील सर्वात अगोदर पहिलं Kiss कुणी केलं?

तज्ञांच्या मते सर्वात प्रथम किस करण्याची पद्धत ही प्राण्यापासून आलेली असावी, यापासूनच मानवामध्ये चुंबन प्रचलित झाले असावे, असे काहीचे मत आहे. चिंपांझी प्राणी असेच करतात. चिंपांझी आपल्या मुलांना त्यांचा सांभाळताना त्यांचे चुंबन घेतात. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांकडून मानव चुंबन घेण्यास शिकलो, असे काही तज्ज्ञांतुन मत व्यक्त केले जात आहे.

किस करण्याला सुरुवात कशी झाली?

लहान मुलांची गालाची पप्पी, चुंबन घेणे हे सर्वचजण करत असतात. मात्र, ज्यावेळी आपण आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीची (प्रेमिक अथवा प्रेयसीचा) किस घेतो तेव्हा त्यामागील अनेक कारणे असतात. वास्तविक किस करायला सुरुवात कशी आणि कुठून झाली असावी याबद्दल शास्त्रज्ञांकडून वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत. जगातील सर्वात पहिलं चुंबन (Kiss) एक अपघात झाला असावा. हा अपघात लोकांना आवडला आणि त्यानंतर किस घेणे प्रचलित झाले, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

आणखी एक महत्वाचे कारण?

काही शास्त्रज्ञांनी किसबाबत महत्वाचे सिद्धांत मांडले आहेत. चुंबन हा प्रकार अपघातामुळे झाला असावा. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या मानववंश शास्त्र विभागाने यावर संशोधन केले आहे. संशोधनानुसार, मानव एकमेकांच्या जवळ जाऊन वास घेण्याचा प्रयत्न करत असताना अपघाताने त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतले असावे, असा दावा करण्यात आला आहे. किस करण्याचे अनेक प्रकार आहेत. यातील फ्रेंच किस सर्वात प्रचलित आहे. फ्रेंच लोकांनी याची सुरुवात केल्याचा दावा केला जात आहे.

Kiss करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

  • आपण किस केल्याने तणाव दूर होन्यास मदत होते तसेच आराम मिळतो. मेंदूवरील ताण खूप कमी होतो. विशेष म्हणजे किसिंगमुळे तुमच्या मेंदूमधील सेस्क फिलिंगला चालना मिळते . त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चकाकी येते.
  • किस केल्यावर चेहऱ्याला जास्त तजेलदारपणा येतो. आपल्या चेहऱ्यावरील मांसपेशी आणि 112 पोश्चर स्नायू किस केल्याने अॅक्टीव होतात. किस केल्याने आपल्या चेहऱ्याचाही व्यायाम होतो. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकूत्या येत नाही.
  • जास्त घट्टपणे किस केल्याने शरिरातील ऑर्बिक्युलरिस ओरिस स्नायू ओठांना किस करण्यासाठी अॅक्टिव्ह करतो. किसींगमुळे प्रतिकारशक्ती वाढते. असंवेदनशील व्यक्तीला संवेदनशील करते. किस केल्याने आणखी तरूण, बळकट आणि अधिक आनंदी दिसण्यास मदत होते.

तुमचे सर्वस्व एकदाही महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झालेले नाहीत; राणेंचं आव्हाडांना पत्र, निशाणा पवारांवर?

nitesh rane jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केल्यांनतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आव्हाडांना खरमरीत पत्र पाठवलं आहे. या पत्रात औरंगजेबाने कोणकोणती हिंदू मंदिरे तोडली याची यादी जाहीर केली. तसेच तुमचे सर्वस्व एकदाही महाराजांच्या समाधीवर नतमस्तक झालेले नाहीत असं म्हणत नितेश राणे यांनी नाव न घेता शरद पवारांवर (Sharad Pawar) सुद्धा निशाणा साधला आहे.

“आपण औरंग्याबाबत ”औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?“ असे केलेले वक्तव्य स्वाभिविकच आहे, कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे! कारण त्यांनी आपल्या तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही” असं नितेश राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

“काकाप्रमाणे पुतण्यांही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर ‘ नाहीत असे घोषित करतो. औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्यातरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीकरता मी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदीरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय. असं म्हणत नितेश राणे यांनी आव्हाडांचा समाचार घेतला आहे.

औरंगजेबाने खालील हिंदू मंदिरे पाडल्याचा राणेंचा दावा

सोमनाथ मंदीर
कृष्ण जन्मभूमी मंदीर
काशी विश्वनाथ मंदीर
विशश्वेर मंदीर गोविंददेव मंदीर
विजय मंदीर
भीमादेवी मंदीर
मदन मोहन मंदीर
चौंषष्ठ योगिनी मंदीर
एलोरो मंदीर
त्र्यंबकेश्वर मंदीर
नरसिंगपूर मंदीर

Train Cancelled : आज रेल्वेकडून 306 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा

Train Cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Cancelled : धुके आणि वाहतुकीच्या इतर समस्यांमुळे रेल्वेकडून आज (4 जानेवारी रोजी) 306 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कालही रेल्वेने 261 गाड्या रद्द केल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द करण्यात येत आहेत. हिवाळ्यात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. Train Cancelled

Indian Railway: दिल्ली-एनसीआर के लाखों यात्रियों के लिए खुशखबरी, रेलवे चलाने जा रहा 28 लोकल ट्रेनें, जान लें समय और किराया - Indian Railway Good News Good news for lakhs ...

रेल्वेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, आज 271 गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत तर 35 गाड्या या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 25 गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे. तर 16 गाड्यांचे मार्ग इतरस्त्र वळवण्यात आले आहेत. Train Cancelled

How Indian Railways Is Leading The Way In Reducing The Nation's Carbon Footprint

रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट अशा प्रकारे चेक करा

IRCTC आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम या दोघांकडून दररोज रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे आता घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट तपासता येईल. यासाठी सर्वांत आधी https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर, Exceptional Trains च्या पर्यायावर क्लिक केल्यावर रद्द केलेल्या तसेच रीशेड्यूल आणि डायवर्ट केलेल्या गाड्यांची लिस्ट मिळेल. Train Cancelled

Planning a train trip? Railway Ministry urges to follow state-wise guidelines | Times of India Travel

ट्रेनचे स्टेट्स ऑनलाइन तपासा

रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती ऑनलाइन पुरवली जाते. रेल्वेच्या रद्द, रिशेडयूल आणि डायव्हर्ट केलेल्या गाड्यांची माहिती भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर उपलब्ध असते. तसेच रद्द झालेल्या गाड्यांची माहिती NTES या App वरूनही घेता येईल. रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटवर किंवा IRCTC च्या https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 या वेबसाइटवर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स तपासता येते. Train Cancelled

रेल्वेमधील नोकरी विषयक माहितीकरता इथे भेट द्या : Railway Recruitment 

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा

 

2024 ला जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवा; संजय राऊतांचा शिंदे गटाला थेट इशारा

Sanjay Raut Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. यावरून शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी टीका केली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत आज पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला. ‘पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे आणि लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही किंवा कायदा नाही. केसरकर खरचं असं बोलले असतील तर त्यांनी देखील 2024 मध्ये कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा राऊतांनी दिला.

संजय राऊत यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे जे काही संघटन आहे ते आपल्यासोबत आले तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल. आंबेडकरांनी केलेले वक्तव्य सकारात्मक आहे.

शिवशक्ती-भिमशक्ती यांनी एकत्र यावे अशी आमची खूप इच्छा होती. देशातील आणि महाराष्ट्रातील सत्ता उलथवायची असेल तर या दोन शक्ती एकत्र येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकरांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत, असे राऊत यांनी म्हंटले.

Gold Price Today : नवीन वर्षात सोने-चांदी महागले, आजचे नवीन भाव तपासा

Gold Price Today
Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : नवीन वर्षात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. भारतीय वायदे बाजारात आजही सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. आज (4 जानेवारी रोजी) MCX वर सोन्याचा भाव 0.36 टक्क्यांच्या वेगाने ट्रेड करत आहे. चांदीची किंमत आज 0.29 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात, MCX वर सोन्याचा भाव 0.67 टक्क्यांच्या वाढीसह तर चांदीचा दर 0.50 टक्क्यांनी वाढून बंद झाला. Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

आज फ्युचर्स मार्केटमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर कालच्या बंद किंमतीपासून 09:25 पर्यंत 198 रुपयांनी वाढून 55,728 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज सोन्याचा भाव 55,620 रुपये झाला. MCX वर आज चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळत आहे. चांदीचा दर आज 203 रुपयांनी वाढून 70,120 रुपये किलो झाला आहे. आज चांदीचा भाव 70,076 रुपयांवर उघडला. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. सोन्याची स्पॉट प्राईस आज 0.90 टक्क्यांनी वाढून $1,845.64 प्रति औंस तर चांदीची स्पॉट प्राईस 0.01 टक्क्यांनी वाढून प्रति औंस $ 24.09 वर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold prices today rise for 3rd day in a row, near 3-month high, silver rates rise | Mint

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,100 रुपये
पुणे – 51,100 रुपये
नागपूर – 51,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 55,750 रुपये
पुणे – 55,750 रुपये
नागपूर – 55,750 रुपये

Gold Price Today: Gold rises Rs 122; silver gains Rs 340 | Business News – India TV

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Flipkart Sale मध्ये या गॅजेट्सवर ग्राहकांना मिळत आहेत जबरदस्त ऑफर्स, त्याविषयी जाणून घ्या
Bank Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता फक्त मिस कॉल अन् मेसेज द्वारे अशा प्रकारे मिळेल कृषी लोन
LIC Housing Finance कडून कर्ज घेणे महागणार, होम लोनवरील व्याजदरात झाली वाढ
Aadhar Card 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे ??? अशा प्रकारे करा अपडेट

शरद पवार सातारा दौऱ्यावर; रयत शिक्षण संस्थेच्या मासिक आढावा बैठकीस उपस्थिती

Sharad Pawar Satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सातारा येथे दाखल झाले असून आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय बैठक पार पडत असून याला पवारांनी उपस्थिती लावली आहे.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात नुकतीच व्यवस्थापकीय बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीस शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील, खा. श्रीनिवास पाटील, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर उपस्थित आहेत.

संस्थेच्या मासिक आढावा बैठकीनंतर दुपारी 2 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला पवार उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडीवर पवारांकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामतीतून साताऱ्यात पवारांची दमदार एन्ट्री

राजकीय व्यक्ती जेव्हा एखाद्या कार्यक्रमास हजेरी लावतात तेव्हा त्याच्या पहिल्या एन्ट्रीने अनेकजण आकर्षित होतात. शरद पवार यांचीही पहिली एंट्री कायम दमदार असते. आज सकाळी बारामतीतून थेट सातारा येथे पवार यांचे सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

धनंजय मुंडेंच्या गाडीला परळीत अपघात; छातीला झाली दुखापत

Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला परळी येथे रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत होते. यावेळी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास
त्यांची गाडी परळी शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या गाडीतील वाहनचालकाचा अचानकपणे वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

https://www.facebook.com/DPMunde/posts/pfbid0kWvWVB5Vkbdg4w9QUV25keqF4UBheeu1rEwd8kg1axX9ui3tv4XWKgsSXhpzbqYhl

यावेळी गाडीमध्ये असलेल्या धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करीत त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.