Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5826

टिकटॉकवरुन भिडे गुरुजींचा आक्षेपार्ह व्हिडीओ, अश्र्लील चित्रफीत व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात टिकटॉक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यासह कारकर्त्यांनी दिले आहे. जर या विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना कायदा हातात घ्यावा लगे असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी अविनाशबापू सावंत आणि राहुल पवार उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सोशल मीडियावरील टिकटॉक या अँपवर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या विरोधात अश्र्लील व आक्षेपार्ह चित्रफीत बनवून काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी ती व्हायरल केली आहे. अतिशय अश्र्लील भाषेत व किळसवाणे शब्द या व्हिडीओ मध्ये यूजर्स कडून वापरण्यात आले आहेत. सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना अशा प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट तयार करून त्या व्हायरल केल्या आहेत. या पोस्ट व्हायरल करणार्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जातीय तेढ निर्माण होत आहे.

त्यामुळे या टिकटॉक अँपवर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवप्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे केली आहे. श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात जर कठोर कारवाई झाली नाही तर शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते वेळप्रसंगी कायदा हातात घेतील असा इशारा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांनी दिला आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा! शेवटचे सेमिस्टर सोडून सर्व परीक्षा रद्द- उदय सामंत

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसंबंधी संभ्रम होता. त्यामुळं राज्य सरकारनं याबाबत निर्णय घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

या निर्देशांनुसार BA हा तीन वर्षांचा कालावधी आहे त्यात सहा सेमीस्टर असतात. त्यातल्या सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेणार. बीकॉमचंही तसंच असणार आहे. जिथे ८ सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टर होणार, १० सेमीस्टर असतील तिथे १० व्या सेमीस्टरची परीक्षा घेणार आहोत. MA, एमकॉम आणि इतर २ वर्षांचा कोर्स आहेत चार सेमीस्टर आहेत तिथे चौथ्या सेमीस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. कालावधी सहा सेमिस्टरचा आहे. सहाव्या सेमीस्टरची परीक्षा होईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्गात प्रवेश मिळणार, मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा या १ ते ३१ जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाउनची स्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

औरंगाबादेत एसआरपीएफ कॅम्पमध्ये खळबळ! 72 जवानांना कोरोनाची लागण

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद शहरात गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या 468 एवढी झाली आहे. एसआरपीएफ कॅम्पमधील 72 जवानांना कोरोनाची लागण zali असल्यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात 90 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

एसआरपीएफ कॅम्पमधील काही जवान हे मालेगांववरुन आले होते. त्यामुळे त्यांच्यात कोरोना सदृश्य लक्षण आढळून आल्याने घाटी रुग्णालयाची एक टीम त्यांची तपासणी करण्यासाठी गेली. तेव्हा येथील 72 जवानांना कोरोनाची लागण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 90 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 468 झाली आहे. यातील 12 जणांचे मृत्यू झाले असुन 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी सापडलेल्या रुग्णामध्ये एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01), ध्यान नगर, गारखेडा (01), एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (01) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

खडसे, मुंडेंना भाजपचा पुन्हा दे धक्का! विधान परिषदेसाठी उभे केले ‘हे’ ४ उमेदवार

मुंबई। येत्या २१ मे ला होऊ  घातलेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपकडून ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. संख्याबळानुसार भाजपला चौथ्या जागेसाठी काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर नवीन चेहऱ्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या ओबीसी नैतृत्व एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने डावलले आहे.

भाजपने वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढा हा आपला बालेकिल्ला गमवावा लागला होता.

या उमेदवारीनंतर भाजपात आता पुन्हा अंतर्गत धुसफूस पुढे येण्याची शक्यता आहे. कारण, विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच वरिष्ठांकडे इच्छा बोलून दाखवली होती. तर त्यांचं नाव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचंही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं. एकनाथ खडसेंना विधानसभेतही तिकीट नाकारण्यात आलं होतं. आता पुन्हा विधानपरिषदेलाही त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाईल, असा अंदाज लावला जात होता.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे निवडणुकीसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी या गोष्टीचे खंडन केलं होत. “कोणाच्याही उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्टीकडून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. सर्व संभाव्य नावांसाठी कोरोनाच्या बंधनामुळे कागदपत्रे जमा करून ठेवण्यात येत आहेत. माझ्या ई-मेल वरून माझ्या पीएने परस्पर विधानसभेतील मथळा उतरवला. त्यानंतर तो कोणीतरी व्हायरल केला. बातमी झाल्यावर मला याची कल्पना आली, स्पष्ट करत आहे,” असं ट्विट करुन पंकजा मुंडे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

वायुसेनेचे मिग-२९ विमान कोसळलं

मुंबई । भारतीय वायुसेनेचे मिग-२९ फायटर विमान शुक्रवारी पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये हे विमान कोसळलं. जालंधर एअर फोर्स बेसवरुन नियमित सरावासाठी या फायटर विमानाने उड्डाण केलं होतं. मात्र अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळलं. जमिनीवर आदळताच या विमानाने पेट घेतला. सुदैवाने मिग-२९ चा वैमानिक सुखरुप आहे. अपघातापूर्वी वेळीच बाहेर पडल्याने या वैमानिकाचे प्राण बचावले. एअर फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मिग-२९ हे रशियन बनावटीचे विमान असून १९९९ साली कारगिल युद्धात शत्रूच्या तळांवर हल्ला करण्यासाठी या विमानांचा वापर करण्यात आला होता. एअरफोर्सकडे ६० पेक्षा जास्त मिग-२९ विमाने आहेत. अत्याधुनिक सिस्टिम आणि शस्त्रास्त्रांनी ही विमाने सुसज्ज आहेत. मल्टीरोल म्हणजेच बहुउद्देशीय प्रकारामध्ये ही फायटर विमाने मोडतात. एअर टू एअर आणि एअर टू ग्राऊंड अशा दोन्ही मिशन्ससाठी ही विमाने उपयुक्त आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 500 च्या घरात

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या 468 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना चाचणी वाढवत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 90 रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 468 झाली आहे. यातील 12 जणांचे मृत्यू झाले असुन 30 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी सापडलेल्या रुग्णामध्ये एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01), ध्यान नगर, गारखेडा (01), एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (01) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

औरंगाबाद येथील ‘त्या’ अपघाताला कोण जबाबदार? प्रत्यक्षदर्शनी घटना पाहिलेला कामगार म्हणतो…

औरंगाबाद प्रतिनिधि | जालना येथील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये शुक्रवारी पहाटे घडली आहे. या कामगारांनी आठवडा भरापुर्वीच गावी जाण्यासाठी पासची मागणी केली होती. मात्र मध्यप्रदेश सरकारने आठवडाभर दखल न घेतल्याने कामगारांवर मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे या अपघात किरकोळ जखमी असलेल्या मजुरांकडून मध्यप्रदेश सरकारच्या दिरंगाईवर ठेवण्यात आले आहे.

अपघातात मृत्यु पावलेल्या आणि जखमी असलेल्या मजुरांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी एका मजूराशी माध्यमांनी संवाद साधला.तेव्हा हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.

दरम्यान जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. औरंगाबाद येथून गावी जाण्यासाठी रेल्वे पकडणार होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे १४ जणांचा चिरडून मृत्यू झाला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1385425101641246/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कामगारांना आहे तिथंच ठेवण्यावर केंद्र सरकारचा भर; आता जनता अन्याय सहन करणार नाही – राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशभरातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादात देशभरात कोरोनाव्हायरस संदर्भातील प्रश्नांवर सुरु असलेल्या चर्चेचा उहापोह राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस प्रस्तावित करत असलेली न्याय योजना तात्काळ लागू करुन देशभरातील गरिबांच्या खात्यावर ७५०० रुपये जमा करण्याची मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. याशिवाय केंद्र सरकार देशातील मजुरांच्या बाबतीत गंभीरपणे विचार करत नसल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली. मजुरांची आरोग्य तपासणी आवश्यक असली तरीसुद्धा त्यात दिरंगाई करुन मजुरांना आणखी त्रास देऊ नका अशी विनंतीही राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारला केली.

कामगारांना लॉकडाऊन वाढवत नेत हतबल करण्याचं काम केंद्र सरकारने केलं आहे. परप्रांतीय मजुरांनी आपापल्या राज्यात परत जावं असं सरकारला अद्यापही वाटत नसल्याचं राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले. काँग्रेसशासित राज्यांमध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांना आम्ही सूचना देत नसून त्यांच्या निर्णयक्षमतेचा वापर करण्याचं स्वातंत्र्य दिलं असल्याचंही गांधींनी यावेळी स्पष्ट केलं.

कोरोनाव्हायरसची तीव्रता वाढत असली तरीसुद्धा कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी लोकांच्या हातात पैसा जाणं गरजेचं असून कुठल्याही परिणामांचा अधिक विचार न करता अन्याय सहन करायला लावणाऱ्या सरकारला लोकं माफ करणार नाहीत असा अप्रत्यक्ष टोला राहुल गांधी यांनी यावेळी नरेंद्र मोदींना लगावला. मोठे उद्योग सुरू झाले नाहीत तर लघु उद्योगांना चालना कशी मिळणार असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. देशभरातील पत्रकारांशी जवळपास दीड तास राहुल गांधींनी संवाद साधला.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मोबाईल शॉपीचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये…! असा तगादा लावणाऱ्या सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सातारा जिल्हयात घडली असून या प्रकरणी नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहितेने गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येने माण तालुक्यात खळबळ उडाली आहे. भालवडी येथील आसमा अस्लम मुलाणी, वय २३ असे या विवाहितेचे नाव आहे. २०१७ मध्ये लग्न झालेल्या आसमाला पहिल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणातून सासरची मंडळी जाच करीत होती. अलिकडच्या दिवसात माहेरहून नवऱ्याला मोबाईल शॉपी टाकण्यासाठी तीन लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिला सतत जाच होत असल्याने आज (दि.8) शुक्रवार रोजी या विवाहितेने सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी नवरा असलम जाफर मुलाणी, सासरा जाफर दादाभाई मुलाणी, सासू अफसाना जाफर मुलाणी ,दुसरी सासू अमजद जाफर मुलाणी यांच्या विरुध्द म्हसवड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारु घ्यायला गर्दी कशाला?; केजरीवाल सरकारकडून ऑनलाईन दारुविक्रीसाठी टोकन सिस्टीम सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांसाठी वाढवन्यात आला आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मद्य दुकानं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. तसंच, रेड झोनमध्येही कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता दारु विक्रीला परवानगी मिळाली. पण, दारुची दुकाने पुन्हा सुरु झाल्यानंतर दारु खरेदीसाठी मद्यप्रेमींची एकच गर्दी दुकानासमोर होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होतीये खर पण कोरोना रुग्णाची संख्या मात्र वाढते आहे. यावर केजरीवाल सरकारने उपाय केला आहे. दारुच्या दुकानासमोर गर्दी होवू नये, म्हणून केजरीवाल यांनी ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरु केली आहे.

केजरीवाल सरकारने https://www.qtoken.in/ ही एक वेबसाइटची लिंक जारी केली आहे. या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर दारु खरेदीसाठी जवळचं दुकान निवडावं लागेल. त्यानंतर तारीख आणि वेळ सांगितली जाईल. त्यावेळेमध्ये संबंधित व्यक्ती रांगेमध्ये उभे न राहता दुकानामध्ये जाऊन दारु खरेदी करु शकेल.

टोकन दुकानात दाखवताना एक सरकारी ओळखपत्रही दाखवावं लागणार आहे. दारुच्या दुकानांबाहेरील गर्दी कमी होत नसल्याने आता सरकारने ऑनलाइन टोकन व्यवस्था सुरू केली आहे.