स्त्रीलंपट चोराला नागपुरात अटक

guilty

५ घटस्फोटित महिलांशी विवाह करून लाखो रुपयांना गंडवले नागपूर | प्रतिनिधी मेट्रीमोनिअल वेबसाईटवर खाते उघडून घटस्फोटीत महिलांना लग्नाच्या जाळ्यात अडकवणाऱ्या आकाश अग्रवाल उर्फ अजय कुंभारे याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. घटस्फोटित महिलांच्या एकटेपणाचा फायदा उचलून मेट्रीमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून अनेक महिलांच्या संपत्तीला या इसमाने चुना लावल्याचे नागपूर पोलिसांनी सांगितले आहे. आजपर्यंत याने पाच स्त्रियांशी लग्न … Read more

नालासोपारा स्फोटक प्रकरणात आणखी एकाला अटक

nalasopara

घाटकोपर (मुंबई) | सुरज शेंडगे नालासोपारा स्फोटक प्रकरणात पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.अविनाश पवार (वय३०) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो सनातन संघटनेशी निगडित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.अविनाश पवार याला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.नालासोपारामध्ये वैभव राऊत या गोरक्षकाला पोलिसांनी … Read more

मोदींच्या बालेकिल्ल्यात भाजपची पिछेहाट

baroda uni

गुजरात | बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत, भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पराभवाचा धक्का बसला आहे. नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया या काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनेने त्यांचा पराभव केला. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी ही निवडणूक झाली होती. एकूण १६,००० विद्यार्थ्यांनी या निवडणुकीत भाग घेतला होता.

फॉरवर्डेड संदेशाचा स्त्रोत देण्यात अडचण – व्हॉट्सअप

wapp

तंत्रज्ञान विश्व | हॅलो महाराष्ट्र टीम सामाजिक वातावरण व्यवस्थित रहावं यासाठी अनेक प्रयत्न सध्या अनेक सोशल नेटवर्किंग साईट करत आहेत. व्हॉट्सअपने संदेश पाठविण्याच्या संख्येवर आणलेली मर्यादा हीसुद्धा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. परंतु फॉरवर्डेड संदेशाचा स्रोत देता येणार नाही असं व्हाट्सअपने स्पष्ट केलं आहे. हा स्रोत उपलब्ध करुन दिल्यास कंपनीच्या अंतर्गत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल … Read more

भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनची अपयशी झुंज

penguine

मुंबई | भारतात जन्मलेल्या पेंग्विनच्या पहिल्या पिल्लाचा शुक्रवारी मृत्यू झाला. हे पिल्लू ९ दिवसांचं होतं. राणीच्या बागेत ही घटना घडली असून सध्या या परिसरात शुकशुकाट पसरला आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम यकृतावर झाल्यामुळे ही घटना घडली.

संगीतकार अशोक पत्की यांचा जन्मदिवस

ashok patki

विशेष | अमित येवले

जाहिरातींचे जिंगल सम्राट म्हणून ओळख असलेल्या अशोक पत्की यांचा जन्म २५ ऑगस्ट १९४१ रोजी झाला. मराठी चित्रपटांतील अनेक गाण्यांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं आहे. तुकाराम, आईशप्पथ, भेट, आनंदाचं झाड, शुभमंगल सावधान, मी सिंधुताई सपकाळ, गलगले निघाले, बिनधास्त या चित्रपटांसाठी त्यांनी संगीतकार म्हणून काम केलं आहे. सर्वश्रेष्ठ संगीत दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. सप्तसूर माझे हे त्यांचं आत्मचरित्रही खूप लोकप्रिय आहे.

त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हॅलो महाराष्ट्र परिवाराकडून मनःपूर्वक सदिच्छा

रुपयाची घसरण हा तितका गंभीर मुद्दा नाही – रघुराम राजन

Rajan

नवी दिल्ली | सध्या डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेला रुपया अनेक भारतीयांना चिंतेत टाकणारा असला तरी अर्थतज्ञ रघुराम राजन यांना मात्र तसं वाटत नाही. काही काळ ही स्थिती राहिल, परंतु मोदी सरकारने चालू खात्यातील तुटीवर लक्ष दिल्यास या संकटातून भारत लवकर बाहेर पडेल असा विश्वास राजन यांनी व्यक्त केला.

आरक्षणाबाबत चर्चासत्र

morcha

पुणे | स्थानिक प्रतिनिधी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी मुस्लिम मूक मोर्चा समन्वय समितीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा,मुस्लिम,धनगर आशा सर्व समाजाच्या बांधवाना या ठिकाणी येण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी बी सावंत, ज्येष्ठ अभ्यासक पी मुजुमदार यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आझम कॅम्पसमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरवात होईल.

जेष्ठ आझाद हिंद सैनिक बाबुमियाँ फरास यांचे निधन

सातारा | विजय मांडके सातारा जिल्ह्यातील जेष्ठ व वयोवृद्ध आझाद हिंद सैनिक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी इब्राहिम उमर ऊर्फ बाबुमियाँ फरास (९८) यांचे अल्प आजार व वृद्धापकाळाने सातारा येथे खाजगी रूग्णालयात ऊपचार घेताना निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांच्या शनिवार माची पेठेतील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर गेंडामाळ येथील कब्रस्तान … Read more

ट्विटर ची टिव-टिव आणि विमानतळ झालं स्वच्छ..!

delhi airport

समाजमाध्यमांचा परिणामकारक वापर प्रेरणादायी दिल्ली | विमानतळावरील फरशीच्या कार्पेटवर चिखलाचे डाग दिसत असूनही त्याबाबत कारवाई केली जात नसल्याने व्यथित झालेल्या सुयश गुप्ता यांनी एक संदेश ट्विटर वर पाठविला. सदरचं ट्विट जयंत सिन्हा व दिल्ली विमानतळ प्रशासनाला उद्देशून केलं होतं. “इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकालाच येथील परिसर स्वच्छ व्हावा असं वाटत आहे. येथून वावरताना दुर्गंधीही खूप पसरल्याची … Read more