बोपन्ना-दिविजला सुवर्णपदक

rohan divij

जकार्ता | आशियाई क्रीडा स्पर्धेत आज सकाळीच टेनिसच्या पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांनी सुवर्णपदक पटकावलं. कझाकिस्तानच्या अॅलेक्झांडर बुब्लिक व डेनिस येवस्येव यांचा त्यांनी पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासातील पुरुष दुहेरी टेनिसमधील हे भारताचे ५ वे सुवर्णपदक आहे.

नौकानयनात भारताचा धमाका, महिला कबड्डीत आज सुवर्णपदकाची आशा

naukanayan

सांघिक सुवर्णपदक तर वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई जकार्ता | येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नौकानयन संघाने सुवर्णपदकाची कमाई केली. दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंग, ओम प्रकाश, सुखमीत सिंग यांच्या संघाने ६ तास १७ मिनिटे १३ सेकंद अशी आश्वासक वेळ नोंदवत प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. दुष्यंत सिंग चौधरी याने लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तर … Read more

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

vijay chavhan

मुंबई | सुरज शेंडगे अनेक मराठी व हिंदी चित्रपटांत आपल्या हलक्या फुलक्या भूमिकांनी रंग भरणाऱ्या विजय चव्हाण यांच दीर्घ आजाराने निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. श्वास घेण्यात येत असलेल्या अडचणींमुळे त्यांना बुधवारी मुलुंड येथील फॉरटीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विजय चव्हाण यांनी आजपर्यंत जवळपास ४०० चित्रपटात काम केले असून त्यांची मोरूची मावशी नाटकातील … Read more

जयललिता यांना भारतरत्न देण्याची मागणी

jaylalita

चेन्नई | तामिळनाडूच्या आरक्षण प्रश्नाची उत्तम हाताळणी जयललिता यांनी केली. सामाजिक न्याय मिळवून देण्याबाबत त्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे. तमिळ अस्मिता जपण्याच व येथील लोकांना वैश्विक ओळख निर्माण करुण देण्याचं काम जयललिता यांनी केलं. यामुळेच त्यांना भारतरत्न देण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा असं मत तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री व जयललिता यांचे कट्टर समर्थक ओ पनिरसेलवम यांनी व्यक्त केलं.

आकर्षणाच्या भिंतीपल्याड…

love beyond attraction

– विभावरी विजया नकाते – प्रेम ही एक खूप महत्वाची भावना आहे, जी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात, वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या स्वरूपात येते व परिणाम करते. खरं तर ‘भावना’ म्हणजे काय असा जर विचार केला तर,भावना म्हणजे मनामध्ये आलेले उत्कट विचार किंवा भावना म्हणजे मानसिक जाणीवा, संवेदना अशा व्याख्या आपल्याला मिळतील.भावना सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्हीपैकी … Read more

एक कोटीच बक्षिस असणारा जहाल नक्षलवादी पोलिसांना शरण

naxalit

रायपूर (छत्तीसगड) | महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांचे एकत्रित एक कोटी बक्षीस असणारा नक्षलवादी छत्तीसगड पोलिसांना शरण आला आहे. पहाडसिंग उर्फ अशोक उर्फ टिपू सुलतान असे त्या नक्षलवाद्यांचे नाव आहे. पहाड सिंग ची पत्नी छत्तीसगड मधील एका गावाची सरपंच होती. सरपंच असतांना २००३ साली पहाड सिंगच्या मित्रांनी च त्याच्या बायकोवर अविश्वास ठराव आणला आणि … Read more

अरुण जेटली आज स्वीकारणार पदभार

Thumbnail

नवी दिल्ली | बरेच दिवस आजारी असणारे देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली सध्या बरे झाले असून ते आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. १४ मे २०१८ रोजी त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली होती. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दोन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. तीन महिन्याहून अधिक काळ सुट्टी असलेल्या जेटलींनी आज पदभार स्वीकारण्याचे … Read more

आशियाई पुरुष कबड्डीतील भारतीय सुवर्णपर्वाची अखेर

Iran

जकार्ता | उपांत्य फेरीत इराणकडून अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय पुरुष कबड्डी संघाच्या सुवर्णपदक मिळवण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. १८ व्या आशियाई स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात इराणने भारताचा २७-१८ असा पराभव केला. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारत पहिल्यांदाच अंतिम सामना खेळू शकणार नाही. पूर्वार्धात ११-१० ने आघाडीवर असणारा भारतीय संघ उत्तरार्धात मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरला. आता … Read more

केरळसाठी कायपण..

ST Mahamandal

केरळ पुरग्रस्तांसाठी पाकिस्तानचा आणि एसटी महामंडळाचा मदतीचा हात पाकिस्तान, महाराष्ट्र व केरळ |अमित येवले सर्व पाकिस्तानी नागरिकांच्या वतीने आम्ही केरळवासीयांसाठी प्रार्थना करीत आहोत. भारताला याप्रसंगी लागेल ती मदत मानवतेच्या भावनेने करायला आम्ही तयार असल्याचं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केलं. शांततापूर्ण सहकार्यासाठी पाकिस्तानने उचललेलं हे पाऊल कौतुकाचा विषय होत आहे. दरम्यान केरळमधील पूरस्थिती … Read more

आणि बसंती मुलाच्या प्रेताजवळ ठिय्या मांडून बसली

Thumbnail

कोरबा, छत्तीसगड | वीजेचा झटका लागून बुधवारी एका हत्तीचा मृत्यू झाला. छत्तीसगड मधील कोरबा जंगल परिसरात सदर प्रकार घडला. वीजेच्या झटक्यात मरण पावलेल्या हत्तीचे नाव वीरू असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मादी हत्ती बसंती तडपडून मेलेल्या वीरुला पाहून बैचन झाली आणि तिने प्रेताजवळ ठिय्या मांडला. हाती आलेल्या माहीतीनुसार, हत्ती वीरु आणि त्याची मादी आई बसंती … Read more