PNB स्वस्तात विकत आहेत 3681 घरे, त्यांचा 29 डिसेंबरला होणार आहे लिलाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ।  जर आपणही स्वस्त घर किंवा स्वस्त मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे चांगली संधी आहे. खरं तर, पंजाब नॅशनल बँक अशा मालमत्तेचा लिलाव करणार आहे. यात रेसिडेंशियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल अशा प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे. तर यावेळी आपण कमी पैशात घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. या अशा मालमत्ता आहेत ज्या डिफॉल्टच्या लिस्ट मध्ये आलेल्या आहेत.  IBAPI (Indian Banks Auctions Mortgaged Properties Information) कडून या संबधीची माहिती देण्यात आलेली आहे.

बँक वेळोवेळी लिलाव करते

मालमत्ता मालकांनी त्यांचे कर्ज दिलेले नाही अथवा काही कारणास्तव त्यांना कर्ज परत करता आलेले नाही. त्या सर्व लोकांची जमीन बँका ताब्यात घेतात आणि अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात मालमत्ता विकून बँक त्यांची थकबाकी गोळा करते.

PNB ने ट्विट करुन दिली माहिती

PNB ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 29 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या रेसिडेंशियल आणि कमर्शियल मालमत्तांचा ई-लिलाव करण्यात येणार असल्याचे बँकेने ट्वीटमध्ये म्हटले आहे. आपण येथे वाजवी किंमतीवर मालमत्ता खरेदी करू शकता.

किती मालमत्ता आहेत

यावेळी 3681 रेसिडेंशियल मालमत्ता आहेत. याशिवाय येथे 961 कमर्शियल मालमत्ता, 527 इंडस्ट्रियल मालमत्ता, 7 कृषी मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्तांचा लिलाव बँकेकडून केला जाईल.

https://t.co/49OJB222jI?amp=1

अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

मालमत्ता लिलावाविषयी अधिक माहितीसाठी आपण https://ibapi.in/ या लिंक वर भेट देऊ शकता.

https://t.co/u0aAEA3fKl?amp=1

बँकेच्या म्हणण्यानुसार ते लिलावासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक नोटीसमधील मालमत्ता, जागा, मोजमाप व फ्रीझोल्ड किंवा भाडेपट्टीबद्दलची माहितीही देते. ई-लिलावाद्वारे तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्ही बँकेत जाऊन प्रक्रिया व त्यासंबंधित मालमत्तेची माहिती घेऊ शकता. 29 डिसेंबर रोजी लिलाव प्रक्रिया होणार आहे.

https://t.co/4qL38p73kR?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.