हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंजाब नॅशनल बँकेने गुरुवारी सांगितले की, त्यांनी दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) च्या एनपीए (एनपीए-नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स) खात्याच्या 3,688.58 कोटी रुपयांच्या फसवणूकीची माहिती आरबीआयला दिली आहे. यापूर्वी सन 2018 मध्ये व्यापारी नीरव मोदी ने पीएनबीबरोबर 15,000 कोटी रुपयांचा फ्रॉड केलेला होता. पीएनबीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत डीएचएफएलच्या फ्रॉड बद्दलची माहिती दिली आहे. बँकिंग नियामक आरबीआयने ठरविलेल्या नियमांनुसार असे खाते जर चार तिमाहीत वसूल केले गेले नाही तर त्याची 100% तरतूद करावी लागते.
आता ग्राहकांचे काय होणार
तज्ञांचे असे म्हणणे आहे की, याचा बँकेच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांचे पैसे हे पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र, यामुळे बँकेचा स्टॉक कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.
डीएचएफएल प्रकरण नक्की काय आहे
दिवाळखोरी कोर्टाकडे नेणारी डीएचएफएल ही देशातील पहिली आर्थिक कंपनी आहे. त्याचे एकूण कर्ज 85,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्याचे प्रमोटर कपिल वाधवन यांच्यावर मनी लाँडरिंगचा आरोप आहे.
या प्रकरणात, ईडी वाधवन बंधूंवर कारवाई करीत आहे. सीरियस फ्रॉड इनवेस्टिगेशन डीएचएफएलची चौकशी करीत आहे. एका फॉरेन्सिक अहवालानुसार, या कंपनीने संबंधित कंपन्या आणि संबंधित प्रमोटर्सना कर्ज दिले होते. अशा 65 कंपन्यांना सुमारे 24,594 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. या कंपन्यांकडे योग्य अशी कागदपत्रेही नव्हती.
पीएनबीने यावेळी म्हटले आहे की, डीएचएफएलच्या खात्यात 3,688.58 कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची नोंद आरबीआयकडे झाली आहे. बँकेने यापूर्वीच नियमांनुसार 1,246.58 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आणि युनियन बँकेनेही डीएचएफएलला फ्रॉड अकाउंट म्हणून घोषित केले. खासगी क्षेत्रातील बँक इंडसइंड बँकेनेही असाच निर्णय घेतला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.