सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
लोकसभा निववडणुकीच्या प्रचाराला राजकीय रंग चढू लागण्याने सर्वच उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशात गोपीचंद पडळकर यांनी विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय पाटील जर परराष्ट्रमंत्री केले असते तर त्यांनी देश विकला असता, अशी टीका करत त्यांनी वसंतदादांच्या संस्था मोडीत काढल्याबद्दल विशाल पाटलांनाही जोरदार लक्ष्य केले.
जिल्ह्यातील आमदारांना मंत्री होण्यापासून रोखणारे, नागेवाडी कारखाना किरकोळ किंमतीत घशात घालून तासगावचा घास घेऊ पाहणारे तर अधिकार्यांच्या बदल्या व कंत्राटांमधून पैसा मिळविणारे भ्रष्ट खासदार संजयकाकांचे डिपॉझीट यावेळी घालवू, अशी घणाघाती टीका बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचार शुभारंभाप्रसंगी बोलताना केली.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ येथील स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. यावेळी प्रचार शुभारंभ सभेत गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंगतात्या शेंडगे, उत्तम जानकर, समाजकल्याण सभापती बह्मानंद पडळकर, शकील पिरजादे, विद्या तामखडे, नानासाहेब वाघमारे यांच्यासह धनगर, मुस्लिम, दलित समाजाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, निवडणूक लढणार नाही म्हणून अनेकांनी अपप्रचार केला. मात्र आता मैदानात उभा आहे. गर्दी जमविण्यासाठी कोणाला पैसे दिले नाहीत. प्रस्तापित व्यवस्थेने पिढ्या न पिढ्या अपमान केला. मते घेतली आणि नांगर फिरवला. त्यांना चपराक देण्यासाठी ही निवडणूक आहे. खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. तरी देखील उमेदवारी दिली आहे. त्यांना कृष्णा खोरेचे उपाध्यक्षपद देऊन मंत्रीपदाचा दर्जा दिला. त्यांना परराष्ट्र किंवा संरक्षण मंत्री केले असते तर त्यांनी एका रात्रीत देश विकला असता, असा टोला पडळकर यांनी संजयकाका पाटील यांना लगाविला.
जिल्ह्यातील आमदारांना मंत्री होण्यापासून रोखणारे, नागेवाडी कारखाना किरकोळ किंमतीत घशात घालून तासगावचा घास घेऊ पाहणारे तर अधिकार्यांच्या बदल्या व कंत्राटांमधून पैसा मिळविणारे भ्रष्ट खासदार संजयकाकांचे डिपॉझीट यावेळी घालवू, अशी घणाघाती टीका बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचार शुभारंभा प्रसंगी बोलताना केली. संजयकाकांना जर परराष्ट्रमंत्री केले असते तर त्यांनी देश विकला असता, अशी टीका करत त्यांनी वसंतदादांच्या संस्था मोडीत काढल्याबद्दल विशाल पाटलांनाही जोरदार लक्ष्य केले.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा
नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..
अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर
नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”
राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा
या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट
मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर