पंतप्रधान मोदी करणार इंडिया ग्लोबल वीक ला संबोधित 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रिटन मध्ये होणाऱ्या इंडिया ग्लोबल वीक २०२० ला संबोधित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून ही माहिती दिली आहे. उद्या दुपारी १:३० वाजता इंडिया इंक कडून आयोजित करण्यात आलेल्या इंडिया ग्लोबल वीक ला संबोधित करणार आहे असे त्यांनी लिहिले आहे.

जागतिक विचारांचे नेते आणि इंडस्ट्री कॅप्टन यांचे हे फोरम आहे. जे भारतातील संभावना आणि  कोविड-१९ नंतर जागतिक आर्थिक स्थिती यावर चर्चा करणार आहे.  व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे मोदी या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. इंडिया इंकच्या सीईओ तसेच चेअरमन मनोज लडवा यांनी सांगितले आहे की कोविड-१९ च्या कठीण काळात आपली बहुआयामी प्रतिभा, तांत्रिक ज्ञान आणि नेतृत्वासाठी वाढलेली इच्छा यांच्यासोबत भारत जागतिक विषयांमध्ये केंद्रीय भूमिका निभावत आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांचा संदेश देशासाठी महत्वपूर्ण असणार आहे असे ते म्हणाले.

 

या तीन दिवसीय संमेलनात परदेश मंत्री एस. जयशंकर, रेल्वे तथा वाणिज्य मंत्री पियुष गोयल, नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी, सूचना तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि कोशल्य विकास मंत्री महेंद्र नाथ पांडे देखील असणार आहेत. ब्रिटन कडून प्रिन्स चार्ल्स या कार्यक्रमात विशेष संबोधन करणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.