‘…तो इशारा मांजरेकरांसाठीच,’ रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने अनेक वेळा आपल्या अष्टपैलु खेळीने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. रविंद्र जडेजा आणि भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामध्ये 2019 वर्ल्ड कपदरम्यान वाद झाला होता. वर्ल्ड कपमध्ये कॉमेंट्री करताना संजय मांजरेकर यांनी जडेजा बिट्स ऍण्ड पिसेस म्हणजेच थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करणारा खेळाडू असल्याचे वक्तव्य केले होते. जडेजाला संजय मांजरेकर यांनी केलेले हे वक्तव्य अजिबात आवडले नाही. यानंतर रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 77 रनची खेळी करून बॅटने तलवारबाजी करत सेलिब्रेशन केले. हा सेलिब्रेशनचा इशारा संजय मांजरेकर यांनाच होता असे जडेजाने सांगितले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 2019 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये जडेजाने शानदार खेळी करून भारताला विजयाच्या जवळ नेले होते पण दुर्दैवाने या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या सामन्यात त्याने जडेजाने 59 बॉलमध्ये 77 रन केले होते. या सामन्यात केलेल्या अर्धशतकानंतर मी कॉमेंट्री बॉक्समध्ये संजय मांजरेकरांना शोधत होतो, कारण तलवारबाजीच्या सेलिब्रेशनने मला त्यांच्यावर निशाणा साधायचा होता, असा खुलासा जडेजाकडून करण्यात आला आहे. त्यावेळी संजय मांजरेकर आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वाद खूप मोठा मुद्दा बनला होता. ‘मी कॉमेंट्री बॉक्स शोधत होतो. मग मी विचार केला, ते कुठेतरी असतीलच, मी ते सेलिब्रेशन कोणावर निशाणा साधण्यासाठी करत होतो, ते सगळ्यांना माहितीच आहे,’ असेदेखील जडेजा म्हणाला.

यानंतर जडेजाची प्रतिक्रिया
‘2018 साली ओवलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या टेस्टनंतर माझा खेळ पूर्णपणे बदलला. एखादा बॅट्समन जेव्हा इंग्लंडमध्ये रन करतो, तेव्हा चांगलं वाटतं. सर्वोत्तम बॉलिंग आक्रमणासमोर इंग्लंडच्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही रन करता तेव्हा, तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही जगात कुठेही रन करू शकता, हे तुम्हाला जाणवतं. नंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली, त्यामुळे माझं टीममध्ये पुनरागमन झालं. तेव्हापासून मी चांगला खेळत आहे,’ अशी प्रतिक्रिया रवींद्र जडेजाकडून देण्यात आली होती. सध्या रवींद्र जडेजा भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये खेळत आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये देखील तो खेळणार आहे.

Leave a Comment