RBI ने बदलले पैशांच्या व्यवहाराशी संबंधित ‘हे’ नियम, त्याचा तुमच्यावर थेट परिणाम कसा होईल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI च्या चलनविषयक धोरण (RBI Monetary Policy) बैठकीचा निर्णय आज आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्याजदरामध्ये आणखी बरेच बदल जाहीर केले आहेत. या सभेच्या 10 मोठ्या घोषणांविषयी आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल याबद्दल जाणून घेऊयात…

RBI ने व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर हा 4% वर कायम आहे.

रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के राहील, असा निर्णय MPC ने एकमताने घेतला आहे.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की,” ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली आहे. चालू आर्थिक वर्षात विक्रमी धान्य उत्पादन झाले आहे. स्थलांतरित कामगार पुन्हा एकदा शहरात परत आले आहेत.”

ऑनलाईन कॉमर्स मध्ये तेजी आली आहे आणि लोकं आपापल्या ऑफिसेसमध्ये परतले आहेत. आर्थिक वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीत चलनवाढ कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

दास म्हणाले की,” अर्थव्यवस्थेत तेजीची आशा आहे. आम्ही चांगल्या भविष्याचा विचार करीत आहोत. सर्वच क्षेत्रात चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे वाढीची आशा दिसून येते आहे.”

रब्बी पिकांचा आउटलुकही अधिक चांगला दिसत आहे. साथीचे संकट आता थांबवण्याबरोबरच आर्थिक सुधारणांवर अधिक भर देण्यात आला आहे.

RBI ने जाहीर केले आहे की, डिसेंबर 2020 पासून कधीही RTGS करता येईल.

RBI गव्हर्नर म्हणाले, ‘वित्तीय वर्ष 2021 मधील जीडीपीत 9.5 टक्के मंदी दिसून येते आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात PMI वाढून 56.9 झाला, जानेवारी 2012 नंतरचा हा उच्चांक आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कर्ज घेण्याची सरासरी किंमत 5.82 टक्के आहे, जी गेल्या 16 वर्षातील सर्वात कमी आहे.

सहकारी बँकांकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) कर्जावर दोन टक्के दराने दिले जाणारे व्याज अनुदान 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली. या योजने साठीच्या अटीही बदलण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.