मुंबई | देशासाहीत राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला को-विन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अॅपच्या मदतीने नोंदणी करण्यास सांगितलं जातं आहे. मात्र काही दिवसांपासून व्हाट्स ऍप वरून देखील लसीकरणाची नोंदणी करता येत असल्याचा मेसेज व्हायराल होतो आहे. मात्र या मेसेज मागचे सत्य काय आहे जाणून घेऊया…
लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला को-विन (Co-WIN) पोर्टल किंवा आरोग्य सेतू अॅपच्या (Aarogya Setu App) मदतीने नोंदणी करण्यास सांगितलं जातं आहे.
An image claiming that COVID-19 #Vaccination appointment can be booked through #WhatsApp is circulating on social media. #PIBFactCheck: This claim is #Fake.
Registration for #COVID19 vaccination can be done only through the COWIN portal and Arogya Setu app. pic.twitter.com/HmqvpraDlo
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 12, 2021
काय आहे व्हाट्सऍपचा हा व्हायरल मेसेज?
या व्हायराल मेसेज मध्ये म्हंटले आहे की,’कोरोना लस घेण्यासाठी व्हॉट्सअॅपद्वारे नोंदणी करता येते. हे अगदी चॅटिंग करण्यासारखं सोपं आहे. नोंदणी करायची असल्यास 9745697456 या नंबरवर Hi असा मेसेज टाका आणि जसं आम्ही सांगतो तसं करा. या नंबरवरून लोकांकडून सुरुवातीला आधार कार्डच्या डिटेल्स मागितले जातात. तसंच तुमच्या पिन कोड नंबरच्या मदतीने रुग्णालय शोधायचं आहे,असं सांगितले जाते’. मात्र अनेक लोक या मेसेज वर विश्वास ठेवतात. पण हा मेसेज खोटा आहे.
केंद्र सरकार ने याबाबत माहिती दिली आहे. को-विन आणि आरोग्य सेतू या दोन पर्यायांशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी लसीकरणासाठी नोंदणी करता येऊ शकत नाही.
व्हाट्सऍप मधील व्हायरल होणाऱ्या या मेसेज मधील दावा खोटा असून याबाबत प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ने जनतेला सतर्क केले आहे.पीआयबीने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे,की कोरोना लसीकरणाची नोंदणी केवळ को-विन पोर्टल आणि आरोग्य सेतू अॅपद्वारेच करता येईल. कोणीही व्हॉट्सअॅपवरून तुम्हाला लसीकरणाच्या नोंदणीबद्दल सांगत असेल तर अशा लोकांपासून सावध रहा,ते तुम्हाला फसवू शकतात, असा सल्लादेखील पीआयबीने दिलाआहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group