हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे वडील तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा आज वाढदिवस आहे. कृषी, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात नवनव्या संकल्पना त्यांनी राबविलेल्या आजपर्यंत दिसून आल्या आहेत. राजकारणात नसले तरी त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे. राजेंद्र पवार यांचा एक वेगळा चाहतावर्ग देखील आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“माझ्या व आईच्या सामाजिक/राजकीय वाटचालीतील मार्गदर्शक,माती व पाण्याशी नाळ असलेले व कर्तृत्व असूनही प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची मोठी सेवा घडो यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!” अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिल्या आहेत.
माझ्या व आईच्या सामाजिक/राजकीय वाटचालीतील मार्गदर्शक,माती व पाण्याशी नाळ असलेले व कर्तृत्व असूनही प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून शेतकऱ्यांची,कष्टकऱ्यांची मोठी सेवा घडो यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! pic.twitter.com/k2cmFJKPJU
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 17, 2020
राजेंद्र पवार हे राजकारणापासून दूर असले तरी विविध क्षेत्रात त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. रोहित पवार यांच्या राजकीय वाटचालीतही त्यांनी नेहमीच त्यांना साथ दिली आहे. ते नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.