Wednesday, June 7, 2023

शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

देशात नवीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांच्या अंबालबजावणीला स्थगिती देऊन कृषी कायद्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती नेमली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचेच सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी असा खोचक टोला रयत क्रांती पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आदरणीय पवार साहेब आज दिल्लीला गेलेले आहेत. त्यांचाही शेतीतला मोठा अभ्यास आहे. ते शेतीतले जाणकार आहेत. पवार साहेब हे जाताना त्यांचे आत्मचरित्र घेऊन गेले असतीलच. आणि मला वाटतंय कि केंद्राला तेच पुस्तक त्यांनी सादर करावा आणि सांगावा कि पवार साहेब आत्मचरित्र कृषी नीती लागू करावी. मला वाटतंय तीच कृषी नीती असावी. शरद पवारांचे पुस्तक हेच कृषीनीती म्हणून लागू केली तरी या देशातील शेतकऱ्यांचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल असा विश्वासही खोत यांनी यावेळी बोलून दाखवला.

दरम्यान, आज कराड सत्र न्यायालयाने सदाभाऊ खोत यांच्यावरील 2012, 2013 साली झालेल्या ऊस दरवाढ आंदोलनातील एकुण 47 केस मधून निर्दोष मुक्तता केली तर 2 केस मधून त्यांना दोषमुक्त केले. न्यायालयाच्या निकालानंतर खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन वकिलांचे आभार मानले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.