धक्कादायक! सरबत प्यायला देऊन अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | मिरजेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरहान युसुब ढालाईत यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या घराजवळ ढालाईत याचे घर आहे. पिडीत मुलीशी ओळख करून तिला वारंवार माझ्याबरोबर चल असे म्हणून तो त्रास देत होता.

पिडीत मुलीच्या घरासमोर ढालाईत याने चिठ्ठी टाकली व त्या चिठ्ठीमध्ये त्या पिडित मुलीस आंबेडकर उद्यानाजवळ बोलावून घेतले. ती अल्पवयीन मुलगी कशासाठी बोलावले असे विचारले असता तू मला आवडतेस असे म्हणून तो तिचा हात पकडू लागला. तिला जबरदस्तीने एका खोलीमध्ये घेवून गेल्यानंतर सरबत पिण्यास दिल्याने त्या पिडीत मुलीला गुंगी आली. काही वेळाने ती शुध्दीवर आल्यानंतर तिने सर्व प्रकार कुटूंबियांना सांगितला.

पिडीत मुलीने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून फरहान युसूब ढालाईत याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.