म्हणुन केली राष्ट्रवादीची निवड – प्रिया बेर्डे 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत. त्या राजकारणात प्रवेश करत असल्यामुळे सध्या राजकारणात प्रवेशासाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षच का निवडला? असे प्रश्न त्यांना विचारले जात आहेत. विधानपरिषदेची निवडणूक तोंडावर असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. पण यावर प्रिया बेर्डे यांनी यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी पक्षच का निवडला सांगितले आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कलेची जाण आहे, कलाकारांची कदर आहे. त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यांनी कला, नाटय क्षेत्रातील अनेकांना मदतीचा हात दिला आहे” असे प्रिया बेर्डे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. कलाकारांबद्दल असणाऱ्या आपुलकी तसेच तळमळीखातर हा पक्ष निवडला असल्याचे त्यांनी सांगितले. “मला कलाकारांबद्दल तळमळ वाटतेय. कलाकार तंत्रज्ञांसाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रवादीचं पाठबळ मिळत असेल तर निश्चित काम करायला आवडेल” असे त्या म्हणाल्या.

अभिनेत्री की, नेता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “मी स्वत:ला कधीही नेता म्हणवणार नाही. मीच नाही, माया जाधव आम्ही सगळेच मिळून एकत्र काम करणार आहोत. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करताय अशी चर्चा आहे, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “असा विचारही माझ्या डोक्यात नाही. मला तळागाळातून काम करायचं आहे. तालुका जिल्ह्यांमध्ये फिरायचं आहे. लोककलावंत, तमाशा कलावंतांचे समस्या जाणून घ्यायच्या आहेत” असे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.