हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य सरकारांनी अद्याप त्यांची मंजूरी दिलेली नाही.
रेल्वेची दसरा दिवाळीसाठीची काय योजना आहे ?
रेल्वेची 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना आहे. सध्या सुरु असलेल्या गाड्यांची वेटिंग लिस्ट खूपच मोठी आहे. दसरा, दिवाळीच्या काळात या गाड्यांसाठी मोठी मागणी आहे.
सणासुदिच्या काळात या मागणीसाठी रेल्वे 120 स्पेशल गाड्या सुरु करणार आहे. या स्पेशल गाड्या मुंबई, कोलकाता, लखनऊ, पटना, दिल्ली या मार्गावर धावतील. सध्या महाराष्ट्र व पश्चिम बंगाल राज्य सरकारशी चर्चा सुरू आहे. या फेस्टिव स्पेशल गाड्यांसाठी नवीन एसओपी देण्यात येईल. गृह मंत्रालयाकडून लवकरच मान्यता मिळणे अपेक्षित आहे.
अनलॉक 4 अंतर्गत 100 नवीन स्पेशल गाड्या चालवण्याच्या तयारीत, भारतीय रेल्वे अनलॉक 4 अंतर्गत स्पेशल गाड्या चालवणार आहेत. रेल्वे सुमारे 100 नवीन स्पेशल गाड्या चालवण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी रेल्वेची राज्यांशी चर्चा सुरू आहे. गृह मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच या नवीन स्पेशल गाड्या चालवल्या जातील. आजपासून देशात अनलॉक 4 सुरू झाले आहे. सद्यस्थितीत, रेल्वे 30 विशेष राजधानीच्या गाड्यांच्या नावाखाली 230 एक्स्प्रेस गाड्यां चालवित आहे.
धावण्यासाठी तयार असलेल्या या 100 गाड्यांचे नावही ‘स्पेशल’ असेल. प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या गाड्या आंतरराज्य आणि इंट्रास्टेट धावतील आणि कोरोना कालावधीत प्रवासी सुरक्षितपणे प्रवास करू शकतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.