सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात संचारबंदी आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा, एप्रिल आणि मे हा संपूर्ण महिना राज्याचे उत्पन्न ९०% नी घसरले आहे. राज्याचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत बंद असल्याने राज्यावर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. चव्हाण यांनी राज्यातील उत्पन्नाची एकूण स्थिती वर्णन करीत सध्या कर्ज काढण्याची आवश्यकता असलयाचे म्हंटले आहे. तसेच याच कारणामुळे त्यांनी सरकारला नवे अंदाजपत्रक करण्याची मागणी केली होती असेही म्हंटले आहे. राज्याचे उत्पन्न घसरले असले तरी खर्च त्या प्रमाणात झालेला नसल्याने पुढे असणाऱ्या आर्थिक स्थितीचा सामना कसा करणार? हा प्रश्न आहे. असेही ते म्हणाले.
राज्याच्या एकूण उपन्नाच्या ५५% भाग हा वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज या तीन बाबींवर खर्च होतो. सध्या व्याजाला मुदत दिली असली तरी वेतनाचा खर्च आहेच. २०२०-२१ च्या अंदाजपत्रकानुसार राज्याचे एकूण उत्पन्न ज्यामध्ये कराचे, कराव्यतिरिक्त महसूल असे एकूण उत्पन्न ४ लाख ३४ कोटीचे आहे. या उत्पन्नाच्या १ लाख १७ हजार कोटी वेतनावर, ३८ हजार कोटी निवृत्ती वेतनावर, ३५ हजार कोटी व्याजावर खर्च होतात. महिन्याला साधारण ९ साडेनऊ हजार कोटी वेतनासाठी आणि ३ सव्वातीन हजार कोटी रु. निवृत्ती वेतनासाठी खर्च होतात. सध्या उत्पन्न अत्यंत कमी आहे. आणि ही तूट भरून काढण्यासाठी कर्जाशिवाय पर्याय नाही. असे चव्हाण म्हणाले.
वित्त आयोगाच्या नियमाप्रमाणे जो कर थेट केंद्र सरकार घेते त्याचा ४२% भाग राज्य सरकारला मिळतो मात्र सध्या केंद्र सरकारचेही उत्पन्न घटले आहे. आणि केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये राज्य सरकारला राज्याच्या सकल उत्पन्नाच्या ३% कर्ज घेता येत होते ते आता ५% पर्यंत कर्ज वाढविण्यात आले आहे असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष केवळ नवीन अर्धा टक्के कर्ज काढता येत आहे.त्यामुळे आता राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशासमोर आणि राज्यासमोर बिकट आर्थिक स्थिती आहे. मात्र यावर मार्ग काढत केंद्र सरकारने नवीन अंदाजपत्रकावर मतदान घ्यावे असे चव्हाण म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.