सैदापूर येथे जादा दराने पेट्रोल, डिझेल विकणाऱ्या पेट्रोल पंपावर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सैदापूर येथील ओगलेवाडी रोडवरती असणाऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल जादा दराने विक्री करण्याच्या कारणावरून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सरस्वती हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाचे विक्रेते, मॅनेजर व मालक यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल आर. एस. जाधव यांनी दिली आहे. पोलिसांनी … Read more

रस्त्यावर गाडी घेऊन फिरणार्‍यांचे परवाने रद्द करणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात संचारबंदी जारि केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अज केली. जमावबंदी असतानादेखील नागरिक रस्त्यावर येत असल्यामुळे निर्णय घ्यावा लागल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कराडमध्येही सोमवारी सकाळी जमावबंदी झुगारून रस्त्यावर नागरिक आले होते. मंडई परिसर, बस स्थानक परिसरासह मुख्य ठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी करू लागले होते. यापार्श्वभुमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी … Read more

सातारा जिल्ह्यात पुन्हा कोरोनासंशयीत! चिली देशातून आलेला ३४ वर्षीय युवक जिल्हा रुग्नालयात दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा अनुमानित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे. त्याला सर्दी असल्याने सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासणीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा … Read more

बुलेटला अज्ञात वाहनाची धडक; जागीच मृत्यू झालेला चालक इंडियन आर्मीतील जवान?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रीय महामार्गावर तळबीड येथे बुलेट चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बुलेटचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सुनिल चौधरी असे मृत्यू झालेल्या बुलेट चालकाचा नाव असू तो पिंपरी चिंचवड येथे राहणारा आहे. बुलेटवर आर्मी असे लिहिलेले असल्याने मृत व्यक्ती जवान असल्याची चर्चा आहे. बुलेटला अज्ञात वाहनाची धडक; जागीच मृत्यू झालेला … Read more

कोरोना व्हायरसमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ, पहा काय म्हणतायत मंगला बनसोडे

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना व्हायरस चा प्रादुर्भावामुळे तमाशा कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या तमाशा मंडळांवर कर्ज काढून आपल्या ताफ्यातील कलावंतांना जेवण घालण्याची वेळ आली आहे. शिमग्या पासून महाराष्ट्रातल्या गावोगावच्या यात्रांना सुरुवात होते. मात्र कोरोना मुळे प्रसिद्ध देवस्थान तसेच गावोगावच्या गर्दीच्या यात्रा रद्द झाल्याने मोठ्या तमाशा मंडळांसह लहान तमाशा मंडळाचा लाखो रुपयाच्या यात्रांच्या … Read more

हुश्श! सातार्‍यातील ‘त्या’ कोरोना संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह पण…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाने सध्या जगभरात थैमान घातले असून सातार्‍यातही कोरोनाचा एक रुग्न सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र सदर कोरोना संशयिताचा आज मेडिकल रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सातारकरांनी आता हुश्श म्हणत निश्वास सोडलाय. रविवारी संध्याकाळी सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला संशयित सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. … Read more

कराड पंचायत समिती शिक्षण विभागाचे कोरोनाला आवतण, शिक्षण महोत्सवाचे आयोजन करुन शाळाकरी विद्यार्थ्यांना वेठीस धरणेचा प्रकार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले असल्याने राज्य शासनाने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम टाळा असे आवाहन केले असताना अनेक संस्थांनी महिला दिनासह अनेक कार्यक्रम रद्द करत ते पुढे ढकलले मात्र कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानाला कोलदांडा दाखवत कराड शिक्षण महोत्सव 2020 जोरदार साजरा केला जात आहे. … Read more

शहीद जवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना ठाकरे सरकारची 50 लाखांची मदत जाहीर

सातारा प्रतिनिधी । संदीप रघुनाथ सावंत हे कराड येथील जवान ३१ डिसेंबर २०१९ रोजी नियंत्रण रेषेवरील नवशेरा सेक्टर जम्मू-काश्मीर येथे शहीद झाले होते. त्यामुळे वीरजवान संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयाची मदत जाहीर झाली आहे. ठाकरे सरकारने ही मदत देऊन सावंत कुटूंबियांना दिलासा दिला आहे. सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी, जवान यांच्या … Read more

कराड नगराध्यक्षाच्या दालनाला ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी ठोकलं टाळ; वेळ न दिल्यानं घेतला आक्रमक पवित्रा

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कराडच्या नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांच्या येथील पालिकेतील केबिनला टाळे ठोकल्याची घटना आज घडली आहे. नगराध्यक्षा जनतेच्या कामांना महत्व देत नाहीत असा ठपका ठेवत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील नगराध्यक्षा शिंदे यांच्या पालिका केबिनला चक्क टाळे ठोकून त्यांना लोकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे … Read more

कृष्णा हॉस्पिटलमध्ये पेसमेकरची रोपण प्रक्रिया यशस्वी;पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच उपचार पद्धतीचा अवलंब

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात अद्ययावत पेसमेकरची यशस्वी रोपण प्रक्रिया नुकतीच पार पडली. अतिशय गुंतागुंतीची समजली जाणारी ही रोपण प्रक्रिया पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली असून, हृदयविकारग्रस्त रूग्णांसाठी ही उपचार प्रणाली वरदान ठरणार आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी हृदयाची कार्यक्षमता कमी होणे आणि ठोके कमी पडणे … Read more