१९९० पासून वराळी शिवसेनेचा बालेकिल्ला

हॅलो विधानसभा । सूत गिरण्यांमुळे पूर्वी प्रसिद्ध असलेला वरळी मतदारसंघ आता कॉर्पोरेट हब आणि मॉल्समुळे ओळखला जातो. १९९० ते २००४ या काळात शिवसेनेचे दिवंगत नेते दत्ताजी नलावडे येथील आमदार होते. त्याकाळी वरळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईचा. कदाचित याचमुळे आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्यासाठी या मतदार संघाची निवड केली. २०१९ विधानसभेसाठी वरळी मतदारसंघातून शिवसेनेकडून आदित्य … Read more

आदित्यला उदयनराजेंची ‘जादू की झप्पी’

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज साताऱ्यातील पाटणमध्ये जाहीर सभा घेतली. पाटण विधानसभेचे शिवसेना उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले माजी खासदार उदयनराजे भोसलेही मंचावर उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले मंचावर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. मात्र त्याचवेळी उदयनराजेंनी पाया पडणाऱ्या आदित्य ठाकरेंना उठवत, त्यांना अलिंगन दिलं. उदयनराजेंनी आदित्यला एकप्रकारे जादू की झप्पीच दिली.

तर तेजस ठाकरे होणार ‘युवासेना प्रमुख’ ?

युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असतानाच आता त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चेचे कारण म्हणजे तेजस ठाकरे यांचा राजकीय व्यासपिठांवर वाढलेला वावर. बुधवारी तेजस हे संगमनेरमधील शिवसेनेच्या सभेमध्ये व्यासपीठावर दिसून आले. यानंतर तेजस यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरेंचा वारस पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई प्रतिनिधी। महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रभावी असणाऱ्या ठाकरे घराण्यातुन निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरेंच नाव आता निश्चित झालं आहे. जनतेची सेवा करण्यासाठी, सर्व जनतेचा आदेश मानत, आज मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला केला आहे. सर्व भेदभाव दूर करुन, नवा महाराष्ट्र घडवण्याची “हीच ती वेळ” असं म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक … Read more

बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

ठाणे प्रतिनिधी | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर आणि ऐरोली विधान सभेत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकी नंतर विजयी मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या नवी मुंबईत … Read more

आदित्य ठाकरेंनी विचारलं कर्जमाफी कोणाकोणाला मिळाली, शेतकरी म्हणाले कोणालाच नाही

ठाकरे

हिंगोली प्रतिनिधी | शिवसेना नेते आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या मराठवाडा दौर्यावर असून ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करत असताना बुधवारी ठाकरे यांनी हिंगोली येथे शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कर्जमाफी कोणाकोणाला मिळाली आहे? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केला. त्यावेळी ‘कर्जमाफी कोणालाच मिळालेली नाही’ असे उत्तर आले. पीकविमा योजना इथे … Read more