एमपीएससी परीक्षा; दोन कोरोनाबाधितांनी दिली परीक्षा, १९८३ परीक्षार्थींची परीक्षेकडे पाठ

औरंगाबाद | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आज २७ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात आली. यावेळी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियम पाळून एमपीएससी परीक्षा घेण्यात आली. एमपीएससी परीक्षेला एकूण ४ हजार २७० परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर तब्बल १ हजार ९८३ परीक्षार्थींनी पाठ फिरवली. … Read more

जि.प. सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला मंजुरी

औरंगाबाद | जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थ समितीचे सभापती किशोर गलांडे यांनी हा अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्वसाधारण सभा ऑनलाइन पध्दतीने अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे 2020 आणि 2021 चे सुधारित आणि 2021, 2022 च्या मूळ अर्थसंकल्पीय … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शक सूचना जारी, साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन

औरंगाबाद | छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. या … Read more

बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या महिलेसह 4 जणांच्या टोळीचा पर्दाफाश, एकाच महिलेचे अनेकांशी विवाह लावून अनेकांना गंडा

औरंगाबाद | बनावट लग्न लावून पैसे उकळणा-या टोळीचा देवगाव रंगारी पोलिसांनी पर्दाफाश केला असून, मुख्य सूत्रधार महिलेसह चार जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, पैसे घेऊन लग्न लावणा-या व फसवणूक करणा-या सक्रीय टोळीची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना  खब-याकडून मिळाली. त्यानुसार अहिरे यांनी बनावट नवरदेव तयार करून … Read more

औरंगाबाद शहरात संचारबंदीची कठोर अंमलबजावणी

aurangabad police

औरंगाबाद : शहरातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. रात्री ८ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी आणि शनिवार, रविवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या उपाययोजनांमुळे कोरोनाची साखळी तुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद मिळाला तर हे शक्य आहे. असे असूनही नागरिक रात्री ८ वाजेनंतर संचारबंदीचे उल्लंघन … Read more

औरंगाबाद शहरात ३७ केंद्रांवर महापालिकेकडून लसीकरण अभियान

औरंगाबाद | राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाची तयारी महापालिकेने केली असून शहरात ३७ केंद्रे यासाठी तयार केले जाणार आहेत. लस घेण्यासाठी येताना नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड या पैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी … Read more

आरटीईची थकीत रक्कम द्या; अन्यथा आंदोलन करू, इंग्रजी शाळा संघटनेचा इशारा

औरंगाबाद | आरटीई कायद्याअंतर्गत राज्यातील सर्व इंग्रजी शाळांनी गरीब व वंचित गटातील पालकांच्या पाल्यास वर्ष २०१२ -१३ पासून प्रतिवर्षी २५ टक्के मोफत प्रवेश दिलेले आहेत. त्यांची प्रतिपूर्तीची रक्कम केंद्र व राज्य सरकारने वर्षातून दोन टप्यात देणे बंधनकारक असताना तीन-चार वर्षांपासून दिलेली नाही जवळपास ५०० कोटीपेक्षा अधिक रक्कम थकित आहे. शासनाने केवळ ५० कोटींची तरतूद करून … Read more

दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच एप्रिल- मे महिन्यांतच होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

औरंगाबाद | इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे 10 वी आणि 12 वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार … Read more

पेट्रोल पंपांवर लागल्या रांगा, विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यातच रात्री ८ वाजेपर्यंतच पेट्रोल पंप सुरू असल्याने आज दिवसभर शहरातील विविध पेट्रोलपंपांवर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच आता लॉकडाऊनची चिंता देखील अनेकांना लागून आहे. त्यातच सध्या शहरात कोरोनाचा आकडा पाहता अंशतः लॉकडाऊन आणि … Read more

महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला, सरकारकडून आज दहा हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता

औरंगाबाद | महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला आहे. पालिका आता नवीन साठ्याच्या प्रतीक्षेत आहे. आज दहा हजार लशींचे डोस प्राप्त होतील, असे मानले जात आहे. सरकारच्या निर्देशानुसार शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणीची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८५ हजार व्यक्तींचे लसीकरण महापालिकेच्या माध्यमातून झाले आहे. सरकारकडून महापालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्रे … Read more