कराडमध्ये मटका खुलेआम सुरुच, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वीनी सातपुते लक्ष घालणार का?

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरातील विविध समाजातील कुटुंबातील ग्रामस्थांनी व विविध राजकीय पक्षातील व्यक्तींनी, विविध संघटनांनी वेळोवेळी अवैद्य विनापरवाना मटका धंदा बंद व्हावा म्हणून निवेदने, उपोषणे करूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यांसाठी आज कराड मध्ये विविध संघटना च्या वतीने मटका बंद व्हावा यासाठी तहसीलदार कचेरी समोर उपोषण सुरू. कराड शहरात गेले … Read more

कराडमध्ये दिवसाढवळ्या वाळूचोरी जोमात, प्रशासन कोमात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात वाळू उपसावर बंदी असल्याने अनेकजण प्रशासन कधी वाळू उपसाचा निर्णय घेणार याकडे नजरा लावून बसलेले आहेत. मात्र कराड शहरालगत वारंवारं नागरिक वाळूचोरीची तक्रारी करत असूनही दिवसाढवळ्या होणारी वाळूचोरी प्रशासनाला दिसत नाही. त्यामुळे वाळूचोर जोमात आणि प्रशासन कोमात असे चित्र पहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या वाळूचोरी करणारे वाळूचोर आणि महसूल … Read more

ओगलेवाडीत युवकावर खुनी हल्ला; उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ओगलेवाडी ता. कराड येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने युवकावर खुनी हल्ला झाला. यामध्ये सदर युवकाचे मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर जखमी युवकाला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरु असतानाच युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी कडेकोट … Read more

‘तान्हाजी’ काढल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये शिवप्रेमींकडून थिएटर बंद

सध्या अजय देवगणची भूमिका असलेला तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात दीडशे कोटीहून अधिक रकमेचा गल्ला जमवलेला तान्हाजी चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांचे जुने विक्रम मोडीत काढत निघाला आहे. तानाजी मालुसरे या शिवाजी महाराजांच्या लढवय्या मावळ्याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांनीही डोक्यावर घेतल्याचं पहायला मिळत आहे.

यंदाचा मुकादम साहित्य पुरस्कार नागनाथ कोतापल्लेंच्या ‘या’ पुस्तकाला जाहीर

कराड प्रतिनिधी | रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादमतात्या यांच्या जयंतीनिमित्त दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु नागनाथ कोतापल्ले यांच्या ‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ या ग्रंथास मुकादम साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे … Read more

कृष्णा बँकेकडुन शहिद कुटुंबियांना एक लाखाची मदत, अतुल भोसलेंकडून वीरपत्नीकडे मदत सुपूर्द

अतिरेक्यांशी लढताना शहिद झालेल्या संदीप सावंत यांच्या कुटुंबियांना कराडच्या कृष्णा ट्रस्टकडून १ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.

कराडचे शहीद संदीप सावंतांचं पार्थिव शुक्रवारी गावी येणार

कराड तालुक्यातील मुंढे गावचे संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहिद झाले असुन सातारा जिल्हयासह गावकऱ्यांना संदिप यांचे पार्थीवाची प्रतिक्षा आहे. या ठिकाणच्या अंत्यसंस्काराची तयारी पुर्ण झाली असून अंतिम संस्कार शुक्रवारी पार पडण्याची शक्यता आहे.

नियंत्रण रेषेवर लढताना कराडच्या जवानाला आलं वीरमरण; जवान संदीप सावंत शहीद

जम्मू -काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीत सशस्त्र पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. शहीद झालेल्यापैकी कराड तालुक्यातील मुंढे गावचे रहिवाशी संदीप रघुनाथ सावंत वय २९ यांचा समावेश आहे. 

बाळासाहेब पाटलांच्या मंत्रीपदाचा साताऱ्यात जल्लोष

ज्याच्या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कराडमध्ये फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

कराडात मटकाकिंगमुळे गुन्हेगारी फोफावतेय, पोलिस कारवाई करणार का?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात मटका खुलेआम चालू असून त्यांची पाळेमुळे ही कराड व मलकापूर शहरात रूजली असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत मटकाकिंग यांच्यामुळे शहरातील वातावरण दूषित झाले असून गुन्हेगारी फोफावू लागली आहे. या प्रकारामुळे वर्चस्ववाद समोर येत असून खूनाच्या घटनाही घडलेल्या आहेत. तेव्हा पोलिसांनी या व्यवसायाची पाळेमुळे शोधून मटकाकिंगच्या मुसक्या … Read more