१२ वर्षाच्या मुलीनं चालत कापलं तब्बल १५० किमी अंतर, घर जवळ येताच झाला दुर्दैवी मृत्यू

वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. असे असतानाच हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. लॉकडाउनमध्ये आपल्या घरी चालत निघालेल्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जमालो मडकाम असं या मुलीचं नाव असून कुटुबाचं पोट भरण्यासाठी ती मिरचीच्या शेतात काम करत होती. लॉकडाउन असल्याने ती आपल्या घरी चालत … Read more

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद; प्रत्युत्तरादाखल गोळीबारात एका नक्षलवाद्याचा खात्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । छत्तीसगडमध्ये नक्षलवादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. विजापूर जिल्ह्यात सोमवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत तर एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कोब्रा बटालियनचे कमांडो शोधीमोहीम राबवत असताना, त्यांच्यावर इरापल्ली गावाजवळ नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले. … Read more

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून नक्षलवादी तळ उध्वस्त; १२ नक्षलींना जिवंत पकडण्यात यश

छत्तीसगडमधील बस्तर आणि दंतेवाडा भागात सुरक्षा दलाने धडक मोहीम राबवली आहे. या ठिकाणी असलेले नक्षलवाद्यांचे तळ उध्वस्त करत १२ नक्षलींना ताब्यात घेण्यात लष्कराच्या तुकडीला यश आलं आहे.

जीएसटी नुकसान भरपाई न मिळाल्यास ५ राज्यांनी दिला केंद्र सरकारला न्यायालयात जाण्याचा इशारा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांचा संताप वाढत आहे. पूर्वी ५ राज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता ७ राज्यांनी केंद्र सरकारच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी धमकीही केरळ या राज्याने दिली आहे.

आयटीपीबी जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, ६ जवानांचा मृत्यु तर २ जण गंभीर

छत्तीसगडमधील नारायणपुर जिल्हयामध्ये इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस दलातील जवानांमध्ये झालेल्या वादविवादात जवानाने च आपल्या इतर सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये सहा जवानाचा मृत्यु झाला असून दोन जवान गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले आहेत.

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती

नक्षलवादी म्हणून पोलिसांनी घातल्या १७ ग्रामस्थांना गोळ्या, न्यायालयाच्या अहवालातून मिळाली माहिती छत्तीसगड पोलिसांनी २०१२ मध्ये बिजापूर जिल्ह्यातील सरकेगुडा येथे केलेल्या बनावट चकमकीत १७ ग्रामस्थांना गोळ्या घालून ठार केले होते, अशी धक्कादायक माहिती न्यायालयीन चौकशीतून उघड झाली आहे. या प्रकरणी सात वर्षे सुनावणी झाली आणि त्यानंतर न्यायमूर्ती विजय कुमार अग्रवाल यांनी याबाबतचा चौकशी अहवाल मागील महिन्यात सादर केला. मात्र, रविवारी हा अहवाल लीक झाला. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४ जवान शहिद

Untitled design T.

रायपूर / छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बीएसएफ जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत तर दोन जवान जखमी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांकडून पुन्हा एकदा जवानांवर हल्ला करण्यास सुरवात केली आहे. छत्तीसगड येथे बीएसएफचे जवान शोधमोहिमेवर होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला यात चार जवान शाहिद आणि दोन जखमी … Read more

गिया आणि मितान, आयुष्यभर मैत्री निभावण्याची अजब प्रथा

Screenshot

या आहेत प्रियंका आणि निसा. ह्या दोन्ही मुली एकमेकांच्या गिया आहेत. गिया म्हणजे मैत्रिणी. अशा मैत्रिणी ज्यांना एकमेकांसोबत आयुष्यभर मैत्री निभवावीच लागेल ! बऱ्यापैकी संपूर्ण छत्तीसगड राज्यात ही प्रथा आहे. आपल्या गावांत किंवा आपल्या आजूबाजूच्या गावांत घरातल्या छोट्या मुला – मुलीसारखी दिसणारी किंवा सारखे नाव असणारी आणि थोडीफार साम्यता असणारी दुसरी तिच्याच वयाची मुलगी किंवा … Read more

पनामा पेपर घोटाळ्यात मुख्यमंत्री पुत्राचा समावेश, छत्तीसगड कॉग्रेसचा दावा

thumbnail 1531050966851

रायपूर : पाकिस्तानच्या न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी देशाला धक्का देणारा निकाल सादर केल्याची घटना ताजी असताना काहीसा तसाच प्रकार भारतातील एका राज्यात होण्याचा सध्या संभव आहे. दोन दिवसांपूर्वी पनामा पेपर लीक घोटाळ्यात नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला अनुक्रमे दहा आणि सात वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या पुत्राचा पनामा पेपर घोटाळ्यात समावेश … Read more