लोकसभेच्या निकालावर पैज लावणे पडले महागात ; दोघांना ही झाली अटक

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे , सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार यावर एक लाख रुपयांची पैज लावणं मिरजेतील दोघांना चांगलंच महागात पडलं. पैज लावणाऱ्या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विजयनगर येथील राजू कोरे आणि शिपुर येथील रणजित देसाई यांना अटक करण्यात आली आहे.  सांगली लोकसभा मतदार संघासाठी दि. २३ रोजी … Read more

उकाड्यामुळे दरवाजा ठेवला उघडा अन घरात झाली चोरी

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे कुपवाड शहरातील बाबावली सय्यद यांच्या घरातील तिजोरीमध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसुत्र, अंगठी व रोख २३ हजार असा एकूण ३९ हजार रुपयांची चोरी अज्ञान चोरट्यांनी केली असून याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. बाबावली सय्यद हे रामकृष्णनगर मध्ये पत्नी, दोन मुलासह राहतात. शुक्रवारी रात्री जेवण करून उकाडा असल्याने झोपताना त्यांनी घराचा … Read more

‘कमळ’ चिन्हांची साडी परिधान करून मतदानाला जाणे महापौरबाईंना पडले महागात

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे, सांगली महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत यांना अतिउत्साह नडला आहे. अंगावर कमळ चिन्ह असलेली साडी परिधानकरून मतदान करण्यासाठी जाण चांगलच महागात पडलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापौरांविरोधात मिरज गांधीनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर महापौरांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात निवडणुक सुरू असताना सांगली, मिरज आणि कुपवाड शहर … Read more

महिलेची छेड काढणाऱ्या टग्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात मोपेडवरून मैत्रिणींसह निघालेल्या महिलेची छेड काढल्यानंतर त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय वडर, इरफान मुल्ला, आकाश शिंदे आणि एक अनोळखी इसम … Read more

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुंची हाकालपट्टी करण्याची मागणी

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी /  शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्याचा सकारात्मक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला असताना कुलगुरूंनी खानापुरची जागा सूचवली आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या कुलगुरूंची हकालपट्टी करावी, अशी मागणी विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीचे अॅड. अमित शिंदे यांनी केले. या संदर्भात राज्यपालांकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु देवानंद शिंदे … Read more

उमेदवारी अर्ज छाननीत एक अर्ज अवैध तर २० अर्ज ठरले वैध

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी /  सांगली लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज झाली. प्राप्त अर्जापैकी आ. सुधीर गाडगीळ यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला. वीस उमेदवारांचे २६ अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीचा सोमवारी अंतिम दिवस आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे, त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा निवडणूक निर्णय … Read more

संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त निघाली मूक पदयात्रा

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी / छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून मूक पदयात्रा काढण्यात आली. वढूबुद्रुक येथून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ज्योत आणली होती. ती मारुती मंदिरात ठेवण्यात आली होती. आज सकाळी मूकपडयात्रेस प्रारंभ झाला. आनंदराव चव्हाण यांच्याहस्ते ज्वालेचे पूजन करण्यात आले. राजू शहापूरे यांनी ध्येयमंत्र म्हंटला. मिलिंद तानवडे यांनी ‘नक्षे परसे नाम मीटादो ”हे गीत म्हटले. … Read more

भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा जिल्ह्यात हायटेक प्रचार

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी / भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे आणि भाजप सरकार व संजयकाकाच्या कामाची माहिती देणाऱ्या एलइडी चित्ररथाचे उदघाटन केळकर महाराजांच्या हस्ते करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल चौकातील महाराष्ट्र बॅंकेजवळ संजयकाकांचे प्रचार कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयातून प्रचाराची सर्व सूत्रे हलविण्यात येत आहेत.कार्यालय प्रमुख म्हणून नगरसेविका भारती दिगडे … Read more

लागीर झालं जी या मालिकेतील कलाकारांची नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक.

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी / स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवत लागीर झालं जी फेम फास्टर राहुल्या व स्लोवर राहुल्या या दोघांना तब्बल १६ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अमरावती येथील संतोष जामनिक व विलास जाधव या दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा इस्लामपूर पोलिसात नोंद करण्यात आला आहे. इस्लामपूर येथील राहुल जगताप व … Read more

विट्यात दीड लाखांची देशी – विदेशी बनावटीची दारू जप्त

Untitled design T.

सांगली प्रतिनिधी /  विटा – कराड मार्गावरून विनापरवाना होणारी दारूची वाहतूक विशेष पोलिस पथकाने पकडली. विट्यातील कृष्णलीला मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ड्रीमलँड वाईन शॉपचा मालक बाबा पटेल आणि ओमनी चालक मंगेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ओमनी चालक मंगेश जाधव … Read more