अमेरिका-तालिबान शांतता कराराचा आज भारत बनणार साक्षीदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ९/११ हल्ल्याला १९ वर्ष  झाले असतांना आज अफगाणिस्तानात अमेरिका आणि तालिबान यांच्यात एक महत्त्वपूर्ण शांतता करार होणार आहे. या कराराची खास बाब म्हणजे तालिबानशी संबंधित प्रकरणात भारत अधिकृतपणे सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांततेच्या करारावर स्वाक्षरी होण्याच्या एक दिवस अगोदर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला काल शुक्रवारी … Read more

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- पंतप्रधान मोदी माझे मित्र आहेत आणि मी भारतात जाण्याची वाट पाहत आहे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ते या महिन्यात आपल्या भारत भेटीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याचे संकेत दिले. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानुसार 24 आणि 25 फेब्रुवारीला भारतात येत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष गुजरातमधील अहमदाबादलाही भेट देतील आणि तेथील स्टेडियममध्ये मोदींसोबत जाहीर … Read more

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी दरम्यान भारत दौर्‍यावर: व्हाइट हाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येतील. व्हाईट हाऊसने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारत दौर्‍यावर येतील! या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल.अमेरिकन आणि भारतीय लोकांमधील संबंध मजबूत आणि … Read more

इराक-अमेरिका संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर; ३५० अंकांची घसरण

इराकने अमेरिकेच्या हवाई तळावर केलेल्यानंतर दोन्ही देशामधील तणाव वाढला आहे. त्यामुळं इराक-अमेरिका यांच्यातील संघर्षाचे पडसाद भारतीय शेयर बाजारावर सुद्धा पडताना दिसत आहेत. आज बुधवारी सकाळी आशियातील शेअर बाजारांमध्ये घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सने बाजार उघडताच ३५० अंकांची घसरण झाली. सध्या तो १८० अंकांच्या घसरणीसह ४०६९० अंकांवर आहे.

अमेरिकेच्या दोन हवाई तळांवर इराणने केला प्रतिहल्ला;डागली १२ क्षेपणास्त्रे

इराकमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दोन लष्करी हवाईतळावर इराणने हल्ला केला आहे. पेंटागॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचं इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आलं आहे.

अमेरिका-इराण तणावाच्या स्थितीत मोदींनी केला ट्रम्प यांना फोन

अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

इराणने बलाढ्य अमेरिकेविरुद्ध छेडले युद्ध !; मशिदीवर फडकावला लाल झेंडा, पहा व्हिडिओ

तेहरान | कुड्स फोर्सचे प्रमुख मेजर जनरल कासेम सोलेमानी यांच्या निधनानंतर इराणने अमेरिकेविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, इराणच्या क्योम या मुख्य मशिदीवर लाल झेंडा फडकविण्यात आला आहे. इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीने हे दाखवून दिले की, पवित्र शहर क्योममधील जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल झेंडा फडकाविण्यात आला आहे. शिया समुदायामध्ये लाल झेंडा म्हणजे सूड किंवा युद्धाची घोषणा होय. क्योममध्ये मशिदीवर … Read more

अमेरिकन आयोगाचा नागरिकत्व विधेयकावर तीव्र आक्षेप,अमित शहांवर निर्बंध लादण्याची केली मागणी

तब्बल आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी मंगळवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे आज केंद्र सरकारची अग्निपरीक्षा होणार आहे. मात्र या विधेयकानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना यापुढे बेकायदा मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येईल. अशा तरतुदी असणारे हे विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.