गुटखा विक्री ः डीवायएसपींच्या पथकाकडून पाऊण लाखांच्या मुद्देमालांसह एकजण ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील गोटे गावच्या हद्दीत स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदा पानमसाला व सुगंधी तंबाखूची विक्री करणार्‍यास डीवायएसपींच्या पथकाने ताब्यात घेतले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इम्रान रमजान देसाई (रा. गोटे, ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोटे गावच्या … Read more

गँगस्टर रवी पुजारीला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

Ravi Pujari

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – गँगस्टर रवी पुजारी यास नाशिक कोर्टाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रवी पुजारी याच्यावर खंडणी आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. सन २०११ मध्ये पाथर्डी फाटा येथील एका बांधकाम साइट्सवर पुजारी टोळीतील चार आरोपींनी गोळीबार करून आपली दहशत निर्माण केली होती. रवी पुजारीच्या टोळीने पाथर्डी फाटा भागातील एकता … Read more

बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या 28 जणांना अटक, पाच लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

Karad Rajy utpadan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू विक्री, वाहतुक करणार्‍यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये 26 जणांवर गुन्हे दाखल करून 28 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 5 लाख 83 हजार 544 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, महाराष्ट्रात सध्या कोरोनाची रूग्ण … Read more

पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून

murder (1)

पुणे | पुण्यातील केस्नंद पेरणे फाटा येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा निर्घुण खून करण्यात आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून करण्यात आला. विशेष म्हणजे, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तिच्या जोडीदारानेच तिचा वायरने गळा आवळून खून केला. लक्ष्मीनगर, रामनगर झोपडपट्टी रस्ता, पेरणे फाटा, तालुका हवेली येथे राहणाऱ्या भारती उर्फ विशाखा राममूर्ति या 17 वर्षीय … Read more

अखेर ‘त्या’ हत्येचे गूढ उलघडण्यात पोलिसांना आले यश

murder

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी गावातील पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या रामधन दांदळे याच्या हत्येचे गूढ उलघडण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. त्याची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचे स्पष्ट झाले आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने त्याचा मृतदेह साथीदारांच्या मदतीने रेल्वे रुळांवर फेकला होता. हाती आलेल्या माहितीनुसार,सोमवारी हात पाय बांधलेल्या अवस्थेमध्ये नागपूर-मुंबई रेल्वे … Read more

वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल ः चार लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

Falthan

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे अनधिकृतरित्या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक( वाळू चोरी) केल्याप्रकरणी फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक येथील दोघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी एक ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू असा सुमारे चार लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

औरंगाबादमध्ये रेमडेसीविर इंजेक्शनची चोरी करून विकणारी हाॅस्पीटलच्या कर्मचाऱ्यांची टोळी गजाआड

औरंगाबाद | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) रुग्णालयातून चोरी केलेले रेमडेसीविर इंजेक्शन विकणारी टोळी गजाआड करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घाटीच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांसह दोन मेडीकल चालकांना गजाआड करण्यात आले आहे. याबाबत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी … Read more

सालपे घाटातील दरोड्यातील मुख्य सुत्रधारांसह ११ जणांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण तालुक्यातील सालपे गावच्या हद्दीत वाठार ते लोणंद जाणाऱ्या मार्गावरील सालपे घाटातील वळणावर 20 ते 25 वयोगटातील अज्ञात 7 ते ८ इसमांनी मालट्रक क्रमांक (एम. एच. 12 एचडी- 4892) अशोक लेलँड कंपनीचा ट्रक आडवा मारला होता. मालट्रकचा चालक व त्याच्या सोबतच्या इसमाचे हात दोरीने बांधून, त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण … Read more

ट्रक चालकांस लुबाडणाऱ्या तोतया तहसिलदारास पोलिस कोठडी

Crime

कोल्हापूर | तहसीलदार असल्याचा बनाव करून चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास अडवून मारहाण करून लुबाडणाऱ्या तोतया तहसिलदारांसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उंब्रज (ता. कराड) येथील ट्रक चालकांस नथुराम कांबळे ( रा. कोळगाव, ता. शाहूवाडी) व त्याचा साथीदार विष्णु विठ्ठल पारवे (रा. असेगाव … Read more

ट्रॅक्टरमधील कडब्यातून दारूची चोरटी वाहतूक; दारूचा साठा गुन्हे शाखेकडून जप्त

औरंगाबाद | ट्रॅक्टरमध्ये कडब्याच्या गंजीखाली लपवून देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांस गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री रंगेहात अटक केली. यावेळी ट्रॅक्टरसह पोलिसांनी 18 देशी दारूचे बॉक्स जप्त केले. सदरची कारवाई झाल्टा फाटा ते चिकलठाणा रस्त्यावर करण्यात आली. याप्रकरणी पुंडलिकनगर आणि सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी नवनाथ श्रीमंत बोडखे … Read more