गुटखा खाने बेतले जीवावर; खाताना ठसका लागला अन्…

औरंगाबाद – गुटखा खाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.काम करताना जोराचा ठसका लागला आणि जागेवर बेशुद्ध झालं. दवाखान्यात नेई पर्यंत तरुणाची प्राणज्योत मालवली ही घटना गुरुवारी संध्याकाळी शहरातील उस्मानपुरा भागात घडली. गणेश जगन्नाथ दास वाग (37, रा. पडमपाणी, रेल्वे स्टेशन परिसर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत … Read more

‘मोमोज’च्या फ्रॅंचाईजची आमिषाने भामट्यांचा व्यापाऱ्याला 12 लाखांचा चुना

औरंगाबाद – ‘वाव मोमोज’ची फ्रॅंचाईजी देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला तिघा भामट्यांनी तब्बल 11 लाख 96 हजार रुपयांना चुना लावला. हा प्रकार डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान घडला. याप्रकरणी तिघा भामट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी औरंगाबादच्या सिंधी कॉलनीतील व्यापारी कैलास तलरेजा (वय 45) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे बीएचआर इंडियन … Read more

बिडीची तलप बेतली जीवावर! बिडी पेटवताना गळ्यातील रुमाल पेटला, अन्…

औरंगाबाद – बिडीचे व्यसन 81 वर्षिय वृद्धाच्या जीवावर बेतल्याची घटना नुकतीच समेार आली. निमखेड(ता. फुलंब्री) येथे 1 मार्च रोजी बीडी पेटविताना गळ्यातील रूमालाने पेट घेतल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला.याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रंगनाथ लिंबाजी जिवरग असे मृताचे नाव आहे. रंगनाथ यांना बिडी चे व्यसन … Read more

महिलादिनीच पतीने केली पत्नीची हत्या

औरंगाबाद – एकीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना एका निर्दयी पतीनेच पत्नीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पैठण शहरापासून जवळच असलेल्या औरंगाबाद रोडवरील संस्कृती हुरडा पार्टी येथे रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी आरोपीसह एकाला ताब्यात घेऊन पैठण ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक मोहनराव मुकुटमल (वय 35 रा.पैठण … Read more

पगाराचे पैसे माझ्याकडे द्या म्हणत, पत्नीचा पतीवर चाकूहल्ला

murder

औरंगाबाद – पगाराचे पैसे माझ्याकडेच देत जा असे म्हणत बँकेतील पतीच्या पोटावर पत्नीने चाकूने वार केला. ही घटना सुधाकर नगर रस्त्यावरील नाथनगर आता उघडकीस आली आहे. शेख निजामुद्दीन इस्माईल (28) हे बँकेत नोकरीला आहेत ते कुटुंबीयांसोबत राहतात. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या पत्नीने आपण वेगळे राहू व तुम्ही पगाराचे पैसे माझ्याकडेच देत जा असे म्हणाली. त्याला शेख … Read more

आई-वडिलांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला, पती दारुडा निघाल्याने सोडले सासर, अखेर…

rape

औरंगाबाद – आई-वडिलांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. अवघ्या दोन वर्षांतच त्याने रंग दाखविण्यास सुरुवात केली. प्रचंड दारू पिऊन दररोज मारहाण करू लागला. हा जाच सहन होत नसल्यामुळे शेवटी दीड वर्षाच्या मुलाला घेऊन तिला घराबाहेर पडावे लागले. काही दिवस नातेवाइकांकडे काढल्यानंतर शेवटी शहर पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाकडे मदतीचा हात मागितला. दामिनी पथकानेही मदतीचा हात देत त्रासलेल्या युवतीची … Read more

डॉक्टर युवतीशी लगट; 48 तासांत दोषारोपपत्र दाखल

Crime

औरंगाबाद – शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल एका महिलेवर निवासी डॉक्टर युवतीने उपचार केले. त्या महिलेचे निधन झाल्यानंतर तिचा पती 9 फेब्रुवारीपासून दररोज हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार करणाऱ्या डॉक्टर सोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या विरोधात डॉक्टर युवतीने 23 फेब्रुवारी रोजी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्याचा तपास 24 तासात पूर्ण करत 48 तासात न्यायालयात … Read more

दारुड्याला पत्नीने घरात घेतले नाही; रात्री नशेत झोपला गाडीखाली अन्…

औरंगाबाद – खाजगी कंपनीच्या गाडीखाली झोपलेल्या कामगाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी गाडीचालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली. रवी किशोर मगरे (30, ह.मु. नारळीबाग, मूळ गाव पळसवाडी, ता. खुलताबाद) असे मृताचे नाव आहे. रवी हा मुकुंदवाडीतील झेंडा चौकासमोरील रस्त्याजवळ पार्क केलेल्या गाडीखाली झोपला … Read more

लग्नाच्या आमिषाने दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपींना अटक

Rape

औरंगाबाद – लग्नाचे आमिष दाखवून 14 आणि 15 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली. मुकुंदवाडी ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2021 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत संजय नगर … Read more

पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल 37 लाखांचा गुटखा जप्त

Police,

औरंगाबाद – औरंगाबाद ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त रित्या कारवाई करत अवैध गुटख्याचा साठा जप्त केला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल 37 लाख 59 हजार 384 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. विशेष म्हणजे छाप्यात पकडलेल्या आरोपींना यापूर्वीही अनेकदा गुटखा विक्री करताना पकडण्यात आल्याचं समोर … Read more