गुटखा विक्रेत्याच्या घरावर छापा; सव्वाचार लाखांचा साठा जप्त  

औरंगाबाद – गुटखा विक्रेत्याच्या घरावर छापा मारून गुन्हे शाखा पोलिसांनी चार लाख 24 हजार 515 रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. हि कारवाई 29 मार्चला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दौलताबादेतील राजवाडा भागात करण्यात आली. सय्यद अजिम सय्यद युनूस असे गुटखा विक्रेत्याचे नाव आहे. राज्यात प्रतिबंधीत पान मसाला, सुगंधीत तंबाखू व गुटख्याचा दौलताबादेतील राजवाडा भागात … Read more

दहावीचा पेपर दिल्यावर पाच मित्र शेततळ्यात पोहायला गेले, अन्…

औरंगाबाद – जिल्ह्यातील अजिंठा येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अनाड रस्त्याजवळ एका शेतातील शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावी कक्षेतील तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यादरम्यान तर इतर दोघे थोडक्यात बचावले. काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घडली. मिळालेल्या माहितीनुसार, उमेरखान नासिरखांन पठान (16, रा.उर्दू शाळेजवळ अजिंठा), शेख मोहमद अनस हब्दुल हाफिज … Read more

आली लहर केला कहर! पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षकाची जीप चोरट्याने चोरली

औरंगाबाद – खुलताबाद पोलीस ठाण्यातून सरकारी जीप चोरून नेऊन ती शेतात सोडल्यानंतर त्या चोरट्याने मध्यरात्री पुन्हा एक दुचाकी व एक छोटा हत्ती घेवून फरार झाला आहे. पोलीस ठाण्यातून पोलीसांचे सरकारी चोरी करून एक प्रकारे त्या चोरट्याने पोलीसांच्या अब्रूचे चांगलेच धिंडवडे काढले. खुलताबाद पोलीस ठाण्यातून पोलीस निरीक्षकाची सरकारी जीप सोमवारी रात्री साडेआठ वाजता विरमगाव येथील संदीप … Read more

तंत्रज्ञानाचा वापर करत एटीएम मशीन फोडून नऊ लाखांची रोकड लंपास

औरंगाबाद – जिल्ह्यातील खुलताबाद शहरातील एसबीआय बँकेच्या शेजारील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडून जवळपास 9 लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खुलताबाद शहरात एकच खळबळ उडाली आहे. खुलताबाद शहरातील एसबीआय बँकेचे शाखेच्या शेजारीच एटीएम मशीन आहे. पहाटे पावनेदोन वाजेच्या सुमारास दोन कारमधून चोरटे आले. त्यांनी प्रथम सेंटरमधील सीसीटीव्हीच्या कँमेरावर … Read more

‘ती’ मैत्रीणीलाच म्हणाली माझ्याशी लग्न कर, नाहीतर…

औरंगाबाद – प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन समलिंगी मैत्रिणींचे ब्रेकअप झाले अन प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेल्याचा प्रकार शहरात घडला आहे. ब्रेकअपनंतर एका तरुणीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दुसरीने सुरुवातीला दामिनी पथक आणि नंतर क्रांती चौक गाठले. पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलावून घेत दोघींकडून हमीपत्र लिहून देऊन प्रकरणावर पडदा टाकला आहे. याबाबतच्या प्राथमिक माहिती नुसार, समीक्षा … Read more

घराला पायाचा धक्का लागल्यामुळे तरुणाचा खून

औरंगाबाद – घराला पायाचा धक्का लागल्याच्‍या क्षुल्लक कारणावरुन सुई-पोती विक्री करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करुन त्‍याचा खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींपैकी अनिल सिनाप्‍पा फुलमाळी (22) याला जन्‍मठेप व 50 हजारांचा दंडाची शिक्षा तर गुन्‍ह्यातील सहआरोपी सोनी अनिल फुलमाळी (19) आणि मारी ऊर्फ मालनबाई सिनाप्‍पा फुलमाळी (50, सर्व रा. रा. संग्रामनगर, सातारा परिसर) यांची चांगल्या वर्तणुकीच्‍या हमीवर … Read more

बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या लॉकर मध्ये कोट्यावधींचे घबाड 

  औरंगाबाद – औरंगाबादमधील बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याकडे लाखोंच रुपयांचं घबाड सापडलंय. बँकेतल्या एकाच लॉकरमध्ये इतकं मोठं घबाड सापडल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकलेत. बांधकाम विभागातील लाचखोर अभियंत्याचं नाव संजय राजाराम पाटील आहे. औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटीलने सव्वा लाखाची लाच मागितली होती. त्यात तडजोड होऊन चाळीस हजाराचा पहिला … Read more

दहावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी मागितले 30 हजार रुपये; संस्थाचालकास अटक

औरंगाबाद – शिक्षणतज्ञ, संस्थाचालक एस.पी. जवळकर याने दहावीच्या विद्यार्थ्याला हॉलतिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी 30 हजार रुपये मागितले. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात एस.पी. जवळकर हे दहा हजार रुपयांची लाच घेताना शाळेतच रंगेहाथ पकडले गेले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कलावती देवी चारीटेबल ट्रस्ट चे … Read more

ठेकेदाराने मजुराची डोके आपटून केली हत्या; कारण वाचून व्हाल थक्क

औरंगाबाद – कामाचे पैसे मागितले म्हणून ठेकेदाराने अमानुषपणे मजुराला मारहाण करुन त्याचे डोके जमिनीवर आपटले. त्यात गंभीर जखमी झालेल्या शौकत अब्बास शहा यांचा शनिवारी मृत्यू झाला. गुरूवारी संध्याकाळी सहा वाजता पीरबाजारात हि घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष दगडु अंभोरे व राजु नाना केदारे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली. शौकत हे वीस वर्षांपासून … Read more

टरबूजाचा ट्रक उलटला; टरबूज लुटण्यासाठी लोकांची झुंबड

औरंगाबाद – कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कलिंगडने भरलेला ट्रक धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड जवळील डोमेगाव फाट्यावर रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याची घटना घडली आहे. या विषयी अधिक माहीती अशी की, औरंगाबादहून बीडकडे कलिंगड घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने ट्रकवरून अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने त्यातील कलिंगड रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातामध्ये … Read more