महाराष्ट्राचा औद्योगिक विकास थांबला नाही, थांबणार नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद – कोरोना काळात लॉकडाऊन होते, तरी महाराष्ट्र थांबला नाही, थांबणारही नाही. या काळात गुंतवणुकीसंबंधीचे 3 लाख कोटींचे करार केले. आतापर्यंत त्यातील 70 प्रकल्पांना भूखंड वाटप केले. या माध्यमातून 3 लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे,असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. ते ऑरीक सिटी हॉल येथे आयोजित औरा ऑफ ऑरीक, एफडीआय ॲण्ड टूरीझम कॉनक्लेव … Read more

काय सांगता! बोर्डाच्या परीक्षा केंद्रावरच लग्नाचा मंडप

exam

औरंगाबाद – यावर्षी मंडळामार्फत शाळा तिथे परीक्षा केंद्र या पद्धतीने दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला परीक्षेच्या काळात वारंवार परीक्षा केंद्र बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. आतापर्यंत शिक्षण विभागाने भौतिक सुविधा नसलेले तब्बल सात परीक्षा केंद्रे बदलली आहेत. राज्य मंडळाकडून बारावीची चार मार्च; … Read more

सिंगापूर, जर्मनीसह दहा देशांचे राजदूत औरंगाबादेत

Ajanta caves

औरंगाबाद – शहरासह परिसरात औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटन राजधानी औरंगाबादच्या परिसरातील औद्योगिक व पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘ऑरा ऑफ ऑरिक’ या विदेशी गुंतवणूक व पर्यटनसंधींबाबत आज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नेते, अधिकाऱ्यांसह दहा देशातील राजदूत या परिषदेला उपस्थित राहणार … Read more

मनपाने 150 कोटी दिल्याने ‘स्मार्ट’ कामांना येणार गती

औरंगाबाद – स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला 31 मार्चपूर्वी 250 कोटी रुपयांचा वाटा करणे बंधनकारक होते. मनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपये मंगळवारी दिले. उर्वरित 100 कोटी लवकरच देण्यात येणार आहे. यापूर्वी मनपाने 68 कोटी रुपये स्मार्ट सिटी जमा केले. ही रक्कम मनपा परत घेणार असल्याची माहिती मुख्य लेखाधिकारी संतोष वाघुळे यांनी दिली. केंद्र शासनाचे … Read more

ऐतिहासिक! शहरात एकाच दिवशी 101 इलेक्ट्रिक कार दाखल

औरंगाबाद – नोंदणी केलेल्या 250 पैकी सोमवारी एकाच दिवशी 101 इलेक्ट्रिक कार शहरात दाखल झाल्या. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्री या कारचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये 25 महिला डॉक्टर्स, उद्योजक, प्राध्यापकांचा समावेश आहे. शहराला ईव्ही मॅपवर नेण्याच्या दिशेने पडलेले हे पाऊल म्हणावे लागेल. दोन महिन्यांपूर्वी मराठवाडा ऑटो क्लस्टरने औरंगाबाद मिशन ग्रीन मोबिलिटी (एएमजीएम) … Read more

औरंगाबादकरांनो सावधान ! हवेची गुणवत्ता जातेय धोक्याकडे

औरंगाबाद – शहरात वाढणारे सिमेंटचे जंगल, औद्योगिकीकरण, वाहनांमधून पडणाऱ्या विषारी धुरामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता आता धोक्याच्या पातळीकडे हळूहळू वाढू लागली आहे. यासंदर्भात वेळीच उपाययोजना न केल्यास औरंगाबादची हवा दिल्लीसारखी होण्यास फार वेळ लागणार नाही. किती आहे शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स – शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 100 पर्यंत असेल तर हवा शुद्ध आहे, असे … Read more

खाम नदीपात्रासाठी 50 कोटींचा डीपीआर सादर

औरंगाबाद – खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी मागील वर्षभरापासून एक रुपयाही खर्च न करता विविध विकास कामे करण्यात येत आहेत. नदीपात्रातील पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने 50 कोटी रुपयांचा डीपीआर काल राज्य शासनाला सादर केल्याची माहिती प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला. या … Read more

औरंगाबादकरांना मिळणार थेट पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस

Gas pipeline

औरंगाबाद – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा ते औरंगाबाद सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याचा भूमिपूजन समारंभ 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ … Read more

साडेनऊ कोटींच्या निविदेत गडबड? निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी

औरंगाबाद – राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची दूध डेरी परिसरात साडेनऊ कोटी रुपयांतून इमारत बांधण्यात येणार आहे. यात कार्यालय आणि दोन निवासी क्वार्टर्सचा समावेश असून या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदेत गडबड असल्याचा आरोप कंत्राटदारांनी सुरू केला आहे. आज कंत्राटदारांचे शिष्टमंडळ बांधकाम विभागांच्या सचिवांची भेट घेऊन पुन्हा निविदा मागवण्याची मागणी करणार आहेत. 21 फेब्रुवारी रोजी निविदा घेण्यास … Read more

मेट्रोच्या डीपीआरवर 7.5 कोटींची उधळपट्टी कशाला ? जलील यांचा सवाल

imtiaz jalil

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत 7.5 कोटी रुपये खर्च करुन मेट्रोलाईन डीपीआर तयार करण्याचे काम सुरु आहे. या कामाला तत्काळ स्थगिती देऊन नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या आशयाचे पत्र त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना पाठवले … Read more