लसीकरणासाठी नागरिकांची उदासीनता; मनपाकडे तब्बल 35 हजार लसीचा साठा शिल्लक

Lasikaran

औरंगाबाद | कोरोनाच्या पार्शवभूमीवर लॉकडाऊनमध्ये लसीकरण घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांनी लस घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत होते. पण आता संसर्गाची लाट ओसरत असून लसीकरण केंद्रे ओस पडू लागली आहेत. सध्या लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेकडे 35 हजार लस साठत … Read more

‘मोदी चॉकलेट’ देत रिपब्लिकन सेनेचे अनोखे आंदोलन

Republican Party

औरंगाबाद | आज औरंगाबाद शहरात रिपब्लिकन सेना तसेच विध्यार्थी कामगार सेना यांनी दिल्लीगेट येथील पेट्रोल पंपाजवळ मोदी चॉकलेट वाटत लक्षवेधी आंदोलन केले. मोदी सरकारने अच्छे दिन आयेंगे म्हणत, पेट्रोल तसेच डिझेल आणि गॅसचे एकाच दिवसात भाव वाढवून गरीब जनतेला चॉकलेट दिले आहे. असा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे. याबरोबरच मोदी सरकारने जनतेला आश्वासन केले होते पेट्रोल, … Read more

डोनाल्ड ट्रंम्प यांना दिलेले इंजेक्शन आता औरंगाबादेतील रुग्णांना…

trump

औरंगाबाद | अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प कोरोना झाला होता तेव्हा जे इंजेक्शन देण्यात आले होते ते इंजेक्शन आता औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. त्या इंजेक्शनचे नाव ‘अँटीबॉडी कॉकटेल’ असे आहे. कोरोना बाधित असताना डोनाल्ड ट्रंम्प यांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ हे इंजेक्शन वापरण्यात आले होते. आता हेचे नवीन औषध कोरोनाच्या उपचारासाठी शहरात दाखल होत … Read more

तुझ्या पत्नीचे माझ्यासोबत प्रेमसंबंध आहेत म्हणत मुलाचे अपहरण; आरोपीला श्रीगोंदाहून अटक  

Kidnaping

औरंगाबाद | तुझ्या पत्नीसोबत माझे प्रेम संबंध आहे. तिला मी घेऊन जाण्यासाठी आलोय असे म्हणत थेट मुलाचेच अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ९ जून रोजी बजाजनगरात घडला. आरोपीला श्रीगोंदा येथे अटक करून मुलाची सुटका करण्यात आली. सागर गोरख आळेकर (रा. श्रीगोंदा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, आळेकर हा त्या विवाहितेच्या … Read more

एमआयडीसीने दिले चिकलठाणा विमानतळाला पाणी; तब्बल बारा वर्षांनंतर सुटला प्रश्न

aurangabad Airport

औरंगाबाद | मागील १२ वर्षापासून चिकलठाणा विमानतळाला भेडसावत असलेला पाणी प्रश्न अखेर संपूष्टात आला आहे. एमआयडीसीने चिकलठाणा विमानतळाला पाणी दिले असून गुरूवारी (दि.10) विमानतळावर जलपुजन सोहळा रंगला होता. तब्बल बारा वर्षानंतर पाणीप्रश्न सुटल्याने चिकलठाणा विमानतळाचे निर्देशक डी. जी. साळवे यांनी याप्रसंगी एमआयडीसीचे आभार व्यक्त केले. चिकलठाणा विमानतळावर झालेल्या जलपुजन सोहळ्यास विमानतळाचे निर्देशक डी. जी. साळवे, … Read more

तिसऱ्या लाटेसाठी मनपाची तयारी; 7 हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था

औरंगाबाद | सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका होऊ शकतो. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. त्याच अनुषंगाने मनपा आयोगान हे पाऊल उचलले आहेत.  सध्या खाजगी व शासकीय हॉस्पिटल मिळून शहरात सात हजार ऑक्सिजन बेडची व्यवस्था झाली असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली. तसेच गरवारे हॉस्पिटल आणि सिव्हिल … Read more

आगामी काळात सर्वसामान्य जनतेसाठी ऊर्जा मंत्रालयाकडून अनेक योजना येणार – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

औरंगाबाद : आज शहरात ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एक दिवशीय दौरा केला. शपथविधीपासून आजपर्यंत पहिल्यांदाच डॉ. नितीन राऊत हे औरंगाबादला आले. सर्व प्रथम त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकलं गेट येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर वाळूज येथे जाऊन ऊर्जा उपकेंद्राचे उदघाटन केले. त्यानंतर यांनी औरंगाबाद येथील महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालय … Read more

उद्योजकाला भामट्याने लावला ६० हजाराचा चुना; एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

money

औरंगाबाद | कंपनीसाठी लागणा-या प्लास्टिकच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून भामट्याने उद्योजकाला ६० हजारांचा गंडा घातला. हा प्रकार २४ मे रोजी घडला. प्रशांत ताटे उर्फ राजेंद्र चौधरी (रा.जळगाव) असे भामट्याचे नाव आहे. दिनेश कचरुदास कापकर (वय ४५, रा. नंदनवन कॉलनी, विशालनगर) यांची मॅट प्रॉडक्शन समिक्षा नावाची कंपनी आहे. त्यांना कंपनीत उत्पादनासाठी कच्च्या मालाची आवश्यकता … Read more

ग्रामीण पोलिस दलात वाहनांचा ताफा दाखल; पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले लोकार्पण

Rural Police Force

औरंगाबाद | ग्रामीण पोलिस दलामध्ये जिल्हा नियोजन व विकास निधीतून 6 स्कार्पिओ, 87 मोटारसायकल आणि सात बोलेरोंचा समावेश झाला आहे.  या वाहनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमता, गतिमानतेत अधिक वाढ होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ स्टेडिअमवर पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. … Read more

औरंगाबादेत 48 धोकादायक इमारतींना प्रशासनाची नोटीस

dangerous buildings in Aurangabad

औरंगाबाद | जुन्या असणाऱ्या इमारती पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतात. पावसाळ्यात इमारती कोसळून अनेक जणांचे प्राण जातात म्हणून महापालिकेच्या वतीने शहरातील धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून दरवर्षी अनेकांचे बळी जात आहेत. मुंबईतील मालाड भागातील चार मजली इमारत कोसळून अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा विषय … Read more