लाचखोर मुद्रांक विक्रेता अटकेत, शेगाव येथे एसीबीची कारवाई

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रेता म्हणून काम करणाऱ्या एका इसमान दस्त नोंदणीसाठी दुय्य्म निबंधकाच्या नावान एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. हे करत असताना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागान त्याला रंगेहाथ पकडलं. ही कारवाई बुधवारी सायंकाळी शेगाव इथं करण्यात आली. या कारवाईन दुय्य्म निबंधक कार्यालयाचे धाबे दणाणले आहे.

बुलडाणा जिल्हयात ऐन सणासुदीला मुसळधार पावसामुळे झेंडू फुलाचे मोठे नुकसान

लडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सुल्तानपुर, रायगाव, गांधारी, लोणारसह बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या पावसान शेतकऱ्यांच्या शेतातील झेंडूच्या फुलांसोबत विविध पिकांची नासाडी झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील बीबी येथे २५ दिवसापासून वीजपुरवठा खंडित

लोणार तालुक्यातील बिबी येथील मागासवर्गीय वस्तीसह गावातील काही भागात २५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने जनजीवन विस्कळीत झाल आहे. त्यामुळं संतापलेल्या नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरण कंपनीन तातडीन उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील महिला वर्गांनी दिला आहे.

धक्कादायक ! २४ तासात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बुलडाणा प्रतिनिधी| बुलडाणा जिल्ह्यातील धाड या गाव शिवारात कर्जबाजारीपणाला कंटाळून  ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्या आहेत. गेल्या २४ तासांच्या अवधीत शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधूमाळी सुरु झाली आहे. तेव्हा निवडणुकांवर लाखो रुपये खर्च केल्या जात असताना दुसरीकडे आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत असल्याच चित्र सध्या जिल्हयात दिसत … Read more

राहुल बोन्द्रे यांच्या भाजप प्रवेशाला चिखलीत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

बुलडाणा प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खलबतांनी जोर पकडला आहे. जो तो आपली जागा शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात असून विचारधारा पक्षनिष्ठा या सगळ्यांना फाट्यावर मारत अनेक नेते भाजप सेनेत प्रवेश करत आहेत. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इनकमिंग मुळे निष्ठावंत मात्र यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. अशाच … Read more

राज्यमहामार्गावर संशयस्पद मृतदेह आढळल, नातेवाईकांना खून केल्याचा संशय

बुलढाणा प्रतिनिधी। लोणार तालुक्यातील राज्यमहामार्गावर युवकाचा संशयस्पद मृतदेह आढळलाय. मात्र हा अपघात की घातपात हे अजून कळायला मार्ग नाही. तालुक्यातून गेलेल्या नागपूर-मुंबई राज्यमहामार्गावर बिबी गावानजिक विजवितरण उपकेंद्राजवळ पिप्रीं खंदारे शिवारात संजय सानप या इसमाचा मृतदेह आढळून आल्यान एकच खळबळ उडालीये. या घटनेविरोधात मृतकाच्या भावाने बिबि पोलिसात तक्रार दिली आहे. माझ्या भावाचा खून केला गेला असल्याचा … Read more

रास्ता गेला खड्ड्यात !!! २५ वर्षांपासून बुलडाण्यातील गिरणी गावाची खड्डे कहाणी..

बुलढाणा प्रतिनिधी ।  महाराष्ट्रात सध्या सर्वत्र खड्डे पुराण सुरु आहे. एक वेळ शहरातील रस्त्यांची प्रशासन कशी-बशी बोळवण तरी करते मात्र ग्रामीण भागाला सावत्र वागणूक मिळते. अशीच वागणूक गेल्या २५ वर्षांपासून एका गावाला मिळत आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील गिरणी हे एक गाव. पण गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी गावाने चकचकीत रस्ता पाहिला नाही … Read more

साहित्य पेटी मिळावी म्हणून हाइटेंशन टॉवरवर चढून कामगाराचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

बुलढाणा प्रतिनिधी। बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कामगार अधिकारी कार्यलयामार्फत विविध कामगारांना मोफत साहित्य पेटी दिल्या जात आहेत. मात्र काही कामगारांना साहित्य पेटी मिळवण्याकरीता कार्यालयात चकरा माराव्या लागता आहेत. त्यामुळं वैतागलेल्या कामगाराने अखेर हाइटेंशन टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गजानन ढगे असे कामगाराचे नाव असून चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील तो रहिवाशुई आहे. गेले काही … Read more

वडिलांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत होत नसल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बुलढाणा प्रतिनिधी| संग्रामपूर ग्रामस्थांच्या वतीने महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच प्रवासी निवारा बांधण्याकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. तरीही त्यांनी ८ दिवसात त्या बद्दल कोणीतीही दखल घेतली नाही. प्रवासी निवारा आणि महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने गावातील महिला तसेच विद्यार्थिनींना खूप त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी आज संग्रामपूर बस स्टँडवर ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज सार्वजनिक … Read more

बुलडाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून पाच जणांचा मृत्यू

बुलढाणा प्रतिनिधी | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. सततच्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जिल्ह्यामधील ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून पाच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पहिली घटना मलकापुर तालुक्यातील लासुरा येथे घडली. जोरदार पावसामुळे येथील विश्वगंगा नदीला पुर आला आहे. नदीमध्ये पोहायला गेलेल्या सागर … Read more