ड्रायव्हरने स्वत:हून बस तलावात उलटवली, २१ जण मृत्युमुखी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये गेल्या आठवड्यात एक बस तलावात पडल्याने मोठा अपघात झाला होता. या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर काही दिवसांनी आता एक मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. या अपघाताचा तपास करणाऱ्या पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. हा अपघात जाणूनबुजून घडविण्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या … Read more

उत्तरप्रदेशात बस आणि ट्रकचा भीषण अपघात;२० जणांचा आगीत होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील कन्नौज इथं शुक्रवारी रात्री जीटी रोड महामार्गावर बस आणि ट्रकची धडक झाली. या भीषण अपघातात २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये ४५ प्रवाशी होते. त्यातील २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पसरणी घाटात शिवशाही बस- ट्रॅव्हल्सचा अपघात,तब्बल ५० प्रवासी जखमी झाल्याची भीती

साताऱ्यामधील वाई आणि महाबळेश्वर मार्गावर असणाऱ्या पसरणी घाटामध्ये शिवशाही बस आणि खासगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ४० ते ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शिवशाही बस-ट्रकचा भीषण अपघात

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड़ा वरुन पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धड़क दिली. या अपघातात शिवशाही बसचे दोन्ही चालक आणि बसमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १२ प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी मेहेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरबिड नजिक महामार्गावरील तळेगाव फाट्याजवळ हा अपघात घडला.

 खाजगी बसचा अपघात, सुदैवाने ३३ प्रवासी बचावले  

मुंबईवरून म्हसवडकडे जात असलेल्या ट्रॅव्हलस बसचा फलटणमध्ये भीषण अपघात झाला. बारामती पूलाजवळ स्मशानभूमी शेजारील बानगंगा नदीच्या कठड्याला धडकून बस खाली गेली. बसमध्ये प्रवास करणारे ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.  मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.