मलकापूर पालिकेच्या मनमानी नियमाबाह्य शुल्कला जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती : महेश पाटील

Malkapur

कराड | मलकापूर पालिकेकडून होणारी नियमबाह्य शुल्क आकारणीला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्थगिती दिली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी सिंह यांनी पालिकेस दिले आहेत. बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संस्थेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी त्या शुल्क आकारणीच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. लोकवर्गणी, मागणीपत्र, पावती या नावाखाली पालिका बांधकाम परवाना देताना अतिरिक्त शुल्काची आकारणी करत होती. ती आकारणी … Read more

प्रशासनाचा दणका : मास्क, सोशल डिस्टन्सनसह नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई

Corona 3rd way

सातारा | दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील 52 व्यक्तींवर कारवाई करुन 12 हजार 800 इतका दंड वसुल करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाबाबत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह … Read more

प्रशासन तीन माकडाच्या भूमिकेत : साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या महोत्सवाला हजारोंची गर्दी

सातारा प्रतिनिधी | महेश पवार सातारा शहरात जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर प्रशासनाच्या नाकावर टिच्चून महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ज्योतिर्मय फाऊंडेशनच्या महोत्सवाला हजारो युवकांनी गर्दी करून नियमांची पायमल्ली केली. या फाऊंडेशनच्या अध्यक्षा भाजपाच्या नगरसेविका सुवर्णा पाटील असल्याने कदाचित प्रशासन तीन माकडाच्या भूमिकेत असल्याचे सातारकरांना पहायला मिळाले. सातारा शहरात असलेल्या  जिल्हाधिकारी यांच्या बंगल्या समोर असलेल्या जिल्हा … Read more

ओमायक्रॉनला रोखण्यासाठी पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे, अन्यथा…

collector

औरंगाबाद – ओमायक्रॉन पासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे त्यामुळे पात्र नागरिकांनी तात्काळ लसीकरण करुन लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा. जिल्ह्यातील जे नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही अशा नागरिकांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस पूर्ण करावा, अन्यथा शासकीय पर्याय वापरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच महाविद्यालय/खाजगी क्लासेस … Read more

कोरोना तपासणीला विरोध केल्यास थेट गुन्हा दाखल करा; जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यात विशेष लसीकरणाची मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. ओमायक्रोन विषाणूपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोविड नियमांचे पालन करावे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची नियमानुसार तपासणी करावी जे तपासणीसाठी विरोध करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. तसेच जिल्ह्यातील प्रवेश ठिकाणांवर परिवहन विभागाने कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांची नियमानुसार काटेकोरपणे तपासणी करावी असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यलायत आयोजित … Read more

…तर रिक्षा होणार जप्त; सोमवारपासून होणार कारवाई

औरंगाबाद – कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. अशातच लसीचा एकही डोस न घेणाऱ्या रिक्षाचालकांवर सोमवारपासून दंडासह वाहन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. तसेच लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांनाच खासगी बस चालकांनी तिकीट घ्यावे असे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन दिवसागणिक नवनवीन आदेश … Read more

मद्यप्रेमींसाठी धक्कादायक बातमी ! लस घेतली असेल तरच मिळणार दारू

औरंगाबाद – कोरोना लसीकरण मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी औरंगाबाद प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणाला वेग मिळावा यासाठी लस नाही तर दारू नाही, ही मोहिम जिल्हाभरात राबवण्यास सुरूवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसींचा मोठ्या प्रमाणात साठा तसाच पडून राहत असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्यासाठी पर्याय म्हणून आणि … Read more

लस न घेतल्यास संबंधितांवर होणार कारवाई – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – ऑटो रिक्षा, ट्रॅव्हल्स एजन्सी, सर्व आस्थापना, हॉटेल्स, खानावळी, मद्य विक्री करणा-या चालक, मालक, कर्मचारी, कामगारांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. संबंधितांनी ती घ्यावी, अन्यथा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार यथायोग्य कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 25 नोव्हेंबरपासून सुरु … Read more

लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी गावनिहाय आरोग्य दक्षता समितीची स्थापना

sunil chavaan

औरंगाबाद – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी व लसीकरण पथकांना सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गावनिहाय आरोग्य दक्षता समितीची स्थापणा केली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच असणार असून ग्रामसेवक सदस्य सचिव असणार आहेत. समिती सदस्यामध्ये उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस … Read more

मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार निलंबनाची कारवाई

Sunil chavhan

औरंगाबाद – आता सर्वकाही अनलॉक होत असताना कोरोनाचा धोका अधिक वाढू नये तसेच लोकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आपल्या जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे. मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा टास्क … Read more