भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ! गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा उद्रेक धोकादायक पातळीवर पोहचला आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण … Read more

कोरोनाचा उद्रेक! मागील २४ तासांत देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित आढळले

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग अजूनही नियंत्रणात आणण्यास सरकारला यश आलेलं नाही आहे. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आता ४३ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात तब्बल ८९ हजार ७०६ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर १ हजार ११५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण … Read more

कहर महामारीचा! देशात गेल्या 24 तासात 75,809 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 1,133 रुग्णांचा मृत्यू

मुंबई । भारतात कोरोना महामारीच्या संक्रमणाची गती थांबत नाहीये. जगातील अनेक देशांमध्ये ही गती नियंत्रणात आली आहे. पण भारतात अजूनही मोठ्या प्रमाणात नवीन कोरोनाबाधित आढळत आहेत. भारतात आतापर्यंत 42,80,423 लोकं कोरोना संक्रमित झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 72,775 लोकांचा बळी गेला आहे. देशातील 33,23,951 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर अजूनही 8,83,697 रूग्णांवर उपचार सुरू … Read more

कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात क्रमांक दोन वर; गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे रुग्ण

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीची स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास सरकारचे प्रयत्न आता तोडके ठरत असल्याचे चित्र आहे. कारण सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशांच्या यादीत भारत ब्राझीलला देखील मागे टाकत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे.देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येन आता ४२ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. … Read more

कहर कोरोनाचा! देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४० लाखांवर

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीने गंभीर स्वरुप धारण केलं आहे. दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. गेल्या २ आठवड्यापासून देशात दर दिवशी ७० हजाराच्या वर रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांमध्ये ८६ हजार ४३२ नव्या रुणांची नोंद झाली असून १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू … Read more

कूटनितीच्या माध्यमातूनच भारत आणि चीन संघर्षावर तोडगा निघू शकतो- परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर

नवी दिल्ली । गेल्या चार महिन्यांत पूर्व लडाखमधील सीमाभागातील तणावाची परिस्थिती आहे. चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. चीनने या भागात केलेल्या कारवायांमुळेच तेथील आजची स्थिती उद्भवली असल्याचे भारताने गुरुवारी म्हटले आहे. दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातूनच तोडगा निघू शकतो, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. तोडगा … Read more

कोरोनाचा उद्रेक! देशात मागील २४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं अनासन दिवसेंदिवस परिस्थिती अजून गंभीर बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जरी केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १०९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३९ लाख ३६ हजार ७४८ इतकी झाली आहे. … Read more

भारताने मोडला कोरोना रुग्णवाढीचा आपलाच विश्वविक्रम; एका दिवसांत आढळले ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांची स्थिती कोरोनाशी लढा देताना गंभीर बनली आहे. विशेषतः मागील काही महिन्यात देशातील रुग्णसंख्ये प्रचंड वाढ झाली असून, दिवसेंदिवस संकट गंभीर बनत चाललं आहे. त्यातच बुधवारी (२ सप्टेंबर) देशात एका दिवसात तब्बल ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या वाढीबरोबरच जगात एका दिवसात इतके रुग्ण आढळून येणाऱ्या देशांच्या … Read more

देशात कोरोना मृतकांचा आकडा ६६ हजारांच्या पार; मागील २४ तासात १ हजार ५४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची स्थिती आहे. दररोज ७५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरसरीनं बाधित रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी या आकड्यात दिलासादायक घट झाली होती. मात्र पुन्हा मागील २४ तासात रुग्णसंख्येचा आलेख वरच्या दिशेकडे वळला आहे. चिंताजनक बाब म्हणजे देशात मृतांची संख्येमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोना … Read more

कोरोना वाढीचा आलेख! भारतात गेल्या २४ तासांमध्ये ६९ हजार ९२१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद

नवी दिल्ली । कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. भारतात गेल्या २४ तासांमध्ये ६९ हजार ९२१ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ८१९ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण ३६ लाख ९१ हजार १६७ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ६५ हजार २८८ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे असल्याचं केंद्रीय … Read more