कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

collector

औरंगाबाद – जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. कोविडवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणासह कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोविड 19 ओमिक्रॉन व्हेरीयंट संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुरूप वर्तनाची तपशीलवार मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आले आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ तर शहरात वाढले ‘इतके’ रुग्ण

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज तब्बल तीनशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 317 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 276 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 41 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 384 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस

औरंगाबाद – कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व या आजारावर नियंत्रणासाठी उपयोगी ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा डोस (बूस्टर) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज घेतला. यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेतील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सहविकार असलेले नागरिकांनी दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लशीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन केले. … Read more

आजपासून जिल्ह्यातील गर्दिवर 9 भरारी पथके करणार नियंत्रण

sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. असे असताना नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होत नाही. शिवाय अनेक ठिकाणी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाभरात प्रत्येक तालुक्यात 1 या प्रमाणे नऊ भरारी पथकांची नियुक्ती करुण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या पथकांद्वारे गर्दीच्या ठिकाणचे चित्रीकरण करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर … Read more

शहरात सुरू होणार पाच कोविड केअर सेंटर

औरंगाबाद – कोरोना ची तिसरी लाट उंबरठ्यावर असून शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सोमवारपासून पाच कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यायचे असल्यास त्यांना होमआयसोलेशन साठी तातडीने आपल्या भागातील मनपा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क साधून नाव नोंदवावे लागणार … Read more

औरंगाबाद शहरात आज कोरोनाचे ‘दीडशतक’

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज दीडशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 183 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 151 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 32 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 285 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील … Read more

औरंगाबादेत कोरोनाने केली ‘शतकांची हॅट्ट्रिक’

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज सलग तिसऱ्या दिवशी शंभराहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 128 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 111 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 257 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन … Read more

कोरोना पसरतोय ! घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना कोरोनाची लागण

corona virus

औरंगाबाद – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर या कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, बुधवारी औरंगाबाद शहरात 103 नव्या रुग्णांची, तर ग्रामीण भागात 17 रुग्णांची वाढ झाली. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. रुग्णांच्या उपचाराच्या सोयी सुविधा … Read more

औरंगाबादकरांनो सावधान ! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ‘शतक’

corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, जिल्ह्यात आज तब्बल 120 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 103 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 229 कोरोनाबाधित रुग्ण … Read more

परिस्थितीचा अंदाज घेऊन शहरातील शाळांबाबत निर्णय

औरंगाबाद – मुंबईत दररोज 8 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने तेथील मनपा प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहरात मंगळवारी 87 कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आम्ही परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहोत. लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊ अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग … Read more