जिल्हा लवकरच होणार निर्बंधमुक्त – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Unlock

औरंगाबाद – कोरोना रूग्णांची कमी होत जाणारी संख्या आणि लसीकरणाचा वाढलेला टक्का यामुळे कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निर्बंध हटवण्यासंदर्भातील शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला शासनाकडून मंजुरी मिळताच जिल्ह्यातील सर्व निर्बंध हटविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी … Read more

राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत परभणी जिल्ह्यासाठी 240 कोटी निधी मंजूर !

परभणी प्रतिनिधी  | कोविड-19 च्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग 21 जानेवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्यानुसार वित्त व नियोनज मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 240 कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे . यावेळी बैठकीस … Read more

औरंगाबाद शहरातील दहावी व बारावीच्या शाळा सोमवारपासून होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली 

औरंगाबाद – राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी च्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या शाळा/वर्ग दिनांक 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा आदेश आज महानगरपालिकेने काढला … Read more

कोरोनाचा विस्फोट सुरुच ! आज साडेसहाशे हून अधिक बाधित

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसहाशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 658 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 519 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 139 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 31 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

जिल्ह्यात किशोरवयीन मुलांचे केवळ 15 टक्केच लसीकरण

औरंगाबाद – जिल्ह्यात तीन जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरण सुरु होवून 12 दिवस होवून गेल्यानंतर केवळ 15 टक्के मुलांचे लसीकरण झाले. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 64 हजार 521 मुलांपैकी केवळ 40 हजार 184 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. अद्याप दोन लाख 24 हजार 337 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान … Read more

सलग तिसऱ्या दिवशी कोरोनारुग्ण 500 च्या पार

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज साडेसाडेपाचशे हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 540 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 423 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 117 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र; तिसऱ्या लाटेवरून दिल्या ‘या’ सूचना

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबरोबर ओमिक्रॉन व्हेरियंट बाबत उपाययोजना करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज देशातील सर्व राज्य, … Read more

कोरोनाचा आलेख वाढताच ! आज कोरोनाने गाठला 350 चा टप्पा

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज तब्बल साडेतीनशेच्या जवळ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 349 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 285 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 64 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 448 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी … Read more

कोरोना रोखण्यासाठी मनपाचा 15 कलमी कार्यक्रम

औरंगाबाद – कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्जझाले असून, पंधरा कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जास्तीत जास्त रुग्ण गृह विलगीकरणात राहणार आहेत. त्यामुळे अशा रुग्णांवर प्रशासनाचे बारीक लक्ष असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. कोरोना उपाययोजनांबाबत पांडेय म्हणाले, की ज्या हेल्थ केअर वर्करने लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतलेला नाही … Read more

पहिल्या दिवशी 150 जणांनी घेतला बुस्टर डोस

vaccine

औरंगाबाद – कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ज्येष्ठ नागरिक, फ्रन्टलाइन वर्कर्स आणि हेल्थ वर्कर बूस्टर डोस घेण्यासाठी सरसावले आहेत. काल पहिल्याच दिवशी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांवर रुग्णालयांमध्ये दीडशे नागरिकांनी बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेने काल शहरातील सर्व आरोग्य केंद्र तसेच पाच रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस देण्याची व्यवस्था … Read more