नगरसेविकेच्या मुलीचा जावयानेच केला सपासप वार करून खून

कल्याण प्रतिनिधी | कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना कल्याणच्या मलंगगड परिसरातील वाडी गावात घडली आहे. मयत स्त्री कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) शिवसेना नगरसेविकेची कन्या होती. राज पाटील असे आरोपी पतीचे तर वैशाली पाटील असे मयत स्त्रीचे नाव आहे. वैशाली ही केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका विमल भोईर यांची कन्या होती. वाडी गावात राहणाऱ्या राज पाटील … Read more

आंतरजातीय विवाहाची नोंदणी करायला गेलेल्या प्रेमीयुगूलाला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण

औरंगाबाद प्रतिनिधी | प्रेम बंधनात अडकलेले जोडपे घरच्यांचा विरोध झुगारून नोंदणी पद्धतीने लग्न करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जोडप्याला ताब्यात घेत एमायडीसीवाळूज पोलिसांच्या हवाली केले. वाळूज … Read more

पालम मध्ये मुख्य चौकात जाळपोळ,दोन गटातील वाद चिघळला

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पालम शहराच्या मुख्य चौकात बुधवारी सायंकाळी दोन गटात झालेला वादाचे रुपांतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ ,हाणामारी व दगडफेक मध्ये रुपांतरीत झाल्याने शहरातील वातावरण तापले आहे. मुख्य बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली असून समाजकंटकांनी केलेल्या जाळपोळीने शहरात दहशतीचे वातावरण आहे . घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून शहरात … Read more

लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार्‍या माॅडेलचा प्रियकरानेच केला होता खून

नागपूर प्रतिनिधी | लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार्‍या वीस वर्षीय माॅडेलचा डोक्यात दगड घालून खून करणार्‍यास अखेर पोलीसांनी अटक केलीय. सदर मोडेलच्या प्रयकरानेच तिचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. हाती आलेल्या माहितीनुसार, खुशी परिहार असे मृत मोडेलचे नाव आहे. अशरफ शेख (वय २८) नावाच्या युवकासोबत खुशी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. आपल्या सोबत … Read more

मुंबईमध्ये भरबाजारात तरुणीवर सपासप वार करून खून

कल्याण प्रतिनिधी | मुंबई शहराचे उपनगर असलेल्या कल्याण येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेऊन एका तरुणीवर सपासप वार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आजही किती गंभीर आहे हेच सांगणारा आहे आजचा प्रकार होता. दोन हल्लेखोराने तरुणीवर सपासप वार केल्याने तिने तरफडून जागीच प्राण सोडला असे एका प्रत्यक्षदर्शनी व्यक्तीने सांगितले … Read more

मलकापूर येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी मलकापूर येथील वारणा हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दा फाश केला आहे. यामध्ये दोन महिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले असून एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार दि.30 जून रोजी सायंकाळी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत … Read more

विहिरीत जीव देण्यासाठी गेलेली ती अडगळीत अडकली आणि झालं असं काही…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी “देव तारी त्याला कोन मारी” याचा प्रत्यय सातार्यातील फलटण तालुक्यात आलाय..घरगुती भांडणातुन झालेल्या वादामुळे विहिरीत जीव देण्यासाठी गेलेली महिला विहिरीच्या अडगळीत अडकली. मात्र या महिलेने आरडाओरडा केल्यावर विहिरीतुन तिला सुखरुप काढण्यात यश आलंय. फलटण तालुक्यातील एका गावात घरगुती वादातुन झालेल्या भांडणात महिलेने गावाजवळच्या एका विहिरीत उडी मारली मात्र “देवतारी त्याला … Read more

गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून कॉलेज पार्किंगमध्ये सपासप वार करून खून

जळगाव प्रतिनिधी |जळगाव मधील मू. जे.महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यावरून झालेल्या हाणामारीत चॉपरने सपासप वार करून खून झाला आहे. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन हा प्रकार घडला आहे. असोदा येथील मुकेश सपकाळे हा विद्यार्थी तृतीय वर्षाला पदवीचे शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मुकेश मू.जे.महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करीत असताना त्याचा काही तरुणांसोबत … Read more

जय श्रीरामाच्या घोषणा देण्यासाठी जबरदस्ती ; मारहाणीत तरुणाचा मृत्यू

रांची (झारखंड ) | जय श्रीरामाच्या घोषणा देण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या झटापटीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. रांची शहरात शम्स तरबेज या तरुणाला मोटार सायकल चोरीच्या संशयात मोठ्या जमावाने घेरले. त्यावेळी त्याला जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सांगितले. मात्र त्याने घोषणा दिल्या नाहीत म्हणून जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात … Read more

एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने केले शिक्षिकेवर चाकूने सपासप वार

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी  बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाने पर्यवेक्षिकेवर चाकूने हल्ला करीत स्वत:वरदेखील वार करून घेतल्याची घटना घडली. जखमी अवस्थेत दोघांनाही जळगाव येथे हलविण्यात आले आहे. बोदवड जवळील नाडगाव इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला पर्यवेक्षिका चंदा गरकळ यांच्यावर के ई पाटील या शिक्षकाने चाकू हल्ला केला . एकतर्फी प्रेमातून … Read more