सातारा जिल्हा बॅंक : कराड सोसायटी गटात मतदानाच्या 12 तास अगोदर भाजप- राष्ट्रवादीची गठ्ठी

कराड | कराड सोसायटी गटातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे स्वतः या ठिकाणी निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री असलेले बाळासाहेब पाटील यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी भाजचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. अतुल भोसले यांच्या मतांची गरज होती. त्यामुळे अर्ज भरल्याच्या दिवसापासून भोसले गटाशी जवळीकता राष्ट्रवादीचे मंत्री श्री. पाटील यांनी केली … Read more

शशिकांत शिंदेंचे मोठे अन अगदी सूचक वक्तव्य; राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा झाल्यानंतर ऑनस्पॉट दाखल

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. … Read more

जावळीत दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा : शशिकांत शिंदेंना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच खिंडीत गाठले

सातारा : राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार व शरद पवार, अजित पवार यांचे विश्वासू असणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच जिल्हा बँकेसाठी खिंडीत पकडले आहे. भाजपचे आ. शिवेंद्रराजे यांचे विश्वासू सहकारी ज्ञानदेव रांजणे हे आहेत. येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊन असे सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कराड येथे केले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती … Read more

कपबशीला मत देऊन सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीमधील सहकार पॅनेल मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यासाठीचा जाहीर मेळावा समर्थ मल्टीपर्पज हॉल, गजानन हौसिंग सोसायटी कराड येथे आज संपन्न झाला. यावेळी कपबशी या चिन्हाला मत देऊन सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब … Read more

सातारा जिल्हा बॅंक : सुनिल माने यांना स्विकृत संचालकपदी घेण्याची मागणी

सातारा | जिल्हा बॅंक अग्रगण्य बॅंक आहे. कोरोनामुळे सुनिल माने आणि मला एक वर्ष जास्त काम करण्यास मिळाली. आम्ही पाच वर्षे दोघांनी एकत्र बॅंकेत काम केले आहे. आता जिल्हाध्यक्ष माने यावेळी निवडणुकीत नाहीत, मात्र पालकमंत्र्यांनी त्यांचा विचार करून त्यांना स्विकृत संचालक म्हणून योग्यवेळी सामावून घ्यावे अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. कराड येथे सातारा … Read more

सातारा जिल्हा बॅंक : कराडला सहकार पॅनेलच्या मेळाव्यात तीन्ही बाबांची अनुपस्थिती

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषगाने कराड सोसायटी गटातील सहकार पॅनेलचे उमेदवार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तीन्ही बाबांच्या अनुपस्थितीचा विषय चर्चेत राहिला. कराड सोसायटी गटातून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज सहकार पॅनेलमधून दाखल करण्यात आला आहे. तर विरोधात कै. विलासराव … Read more

सातारा तालुक्याची सर्व मते सहकार पॅनेललाच मिळतील : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा | अजिंक्यतारा साखर कारखाना आणि सूत गिरणीने सहकारामध्ये एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या दोन्ही संस्थांचे काम प्रगतीपथावर नेले आहे. त्याच पद्धतीने सातारा जिल्हा बँकेतही सर्वांच्या साथीने प्रामाणिकपणे काम करून बँक प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केले. बँकेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी सहकार पॅनेल हाच एकमेव पर्याय असून सातारा … Read more

सातारा जिल्हा बॅंक : राष्ट्रवादीचा भाजपशी तह तर काॅंग्रेस, शिवसेनेशी पंगा

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतच धुसफूस सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. बॅंकेच्या 21 संचालकापैकी 11 बिनविरोध निवडूण आल्यानंतर 10 जण निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने चक्क महाविकास आघाडीतील काॅंग्रेस व शिवसेना पक्षांशी पंगा घेतला असून भाजपाशी तह केल्याचे पहायला मिळत आहे. सातारा जिल्हा बॅंकेत सर्वसामावेशक पॅनेल असल्याचे वारंवारं … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक रिंगणात पदाच्या लालसेपोटी नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

DCC Bank Balasheb

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सहकार तथा पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी गटातून निवडणूक लढवत आहेत. देशात लौकिक असलेल्या या बँकेत सत्तेसाठी नव्हे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सर्व सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. पश्चिम महाराष्ट्राचे … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : ठरावदार पर्यटनाला गेल्याने उमेदवारांवर शोधण्याची वेळ

DCC Bank satara

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील सातारा जिल्हा बॅंकेत 10 जागांसाठी निवडणूक लागली आहे. कराड, जावळी मतदार संघात प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे आपले ठरावदार मतदार विरोधी उमेदवाराला मिळू नयेत, यासाठी पर्यटनासाठी रवाना झालेले आहेत. काल पत्रकार परिषदेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मतदार भेटत नसल्याचे शेवटी बोलून गेले. या प्रकरामुळे ठरावदार मतदारांना शोधण्याची वेळ उमेदवारांना … Read more