टीचकी वाजवत म्हणतील, देवाकडून बंद होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मीच सुरू केला ः आ. शिवेंद्रसिंहराजे

Shivendr Udayn

सातारा | सगंळ साताऱ्यात त्याच्यामुळे होत आहे. आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता तो सुध्दा मीच सुरू केला आहे, असे स्टेटमेंट उदयनराजेंकडून येईल अशी टिचकी वाजवत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सर्वपक्षीय पॅनेलमध्ये खासदार उदयनराजेंना घेणार का? या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणाले. मीच पॅनेलमध्ये आहे का हे मलाच … Read more

मी बांगड्या घालून, शेपूट घालून गप्प बसणारा नाही : छ. उदयनराजे

DCC Bank Satara01

सातारा | बॅंकेत अनियमितता आहे की नाही हे मला माहिती नाही, मी उत्तर देणारापैकी आहे. मी बागड्या घालून, शेपूट घालून गप्प बसणारा नाही. माहिती मागविली आहे, चेअरमन दिली तर ठीक आहे. माझे तत्व आहे, मी गालबोट लावून घेणार नाही असा इशारा छ. उदयनराजे भोसले यांनी दिला. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा खाजगीकरण झाल्यानंतर त्या कारखान्याला सातारा … Read more

सातारा जिल्हा बॅंक : आ. मकरंद पाटील, राजेंद्र तनपुरे, शिवरूपराजे खर्डेकर तिघे बिनविरोध

सातारा | सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सोमवारी दि. 25 रोजी शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये खरेदी विक्री संघातून आ. मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदार संघातून शिवरूपराजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता 18 जागेचा प्रश्न राहिला असून कोण- … Read more

सातारा जिल्हा बॅंकेत जागा अडविणाऱ्या संचालकांना घरी बसवावे : आ. शिवेंद्रसिंहराजे

DCC Bank Satara11

सातारा | सभासदांना विनंती आहे, बॅंकेच्या वाटचालीत योगदान आहे, अशा उमेदवारांना मतदान करावे. केवळ जागा अडविण्यासाठी किंवा सातारा जिल्हा बॅंक देशातील सहकारातील मोठी संस्था आहे, म्हणून काहीजण येवू इच्छितात. काहीजण मागच्या निवडणुकीत जागा अडविण्याठी बॅंकेत आले आहेत, अशांना आता घरी बसवावे अशी टिका आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक निवडणकीसाठी आज … Read more

छ. उदयनराजेचं ठरलं : जिल्हा बॅंकेत गृहनिर्माणमधूनच निवडणूक लढविणार

सातारा | जिल्हा बॅंक सहकारातील अग्रगण्य असल्याचे सांगायला अभिमान वाटतो. बॅंकेच्या माध्यमातून हौसिंग सोसायटी आणि दुग्ध संस्थांचे प्रतिनिधीत्व करताना सहकाराचा जास्तीत जास्त लाभ सभासदांना होण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभासदांच्या इच्छेनुसार याच मतदारसंघातून मी निवडणूक लढण्याचे निश्‍चित केले आहे. त्यास भरभरुन आशीर्वाद दयावेत, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. सातारा जिल्हा बॅंकेच्या गृहनिर्माण आणि दुग्धविकास … Read more

सोसायटीत टशन की माघार : बाळासाहेब पाटील, जगदीश जगताप यांच्यातील चर्चेने वातावरण तापले

सातारा प्रतिनिधी | विशाल पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक निवडणुकीने जिल्ह्यातील वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. काल अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोसायटी मतदार संघातून अॅंड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व भाजपचे अतुल भोसले यांचे विश्वासू जगदीश जगताप यांच्या फार्म हाऊसवर राष्ट्रवादीचे नेते, जिल्ह्याचे … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : पहिल्याच दिवशी अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांचा अर्ज दाखल

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सातारच्या संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूकीसाठी कराड सोसायटी मतदारसंघातून अँड. उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर) यांनी पहिल्याच दिवशी निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. स्व.यशवंतराव चव्हाण, स्व. आबासाहेब वीर यांचे मार्गदर्शनाखाली 1967 साली कराड सोसायटी मतदारसंघातून विलासराव पाटील (काका) यांनी जिल्हा बँकेत प्रवेश केला. सलग 11 … Read more

निवडणुकीचा बिगूल वाजला : सातारा जिल्हा बॅंकेसाठी सोमवारपासून अर्ज दाखल होणार

DCC Bank satara

सातारा | सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवारपासून दि.18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. सातारा जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर आणि पुणे बँकेसंदर्भात उच्च न्यायालय याचिका दखल झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला होता. अखेर … Read more

सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : यादी फायनल 1 हजार 964 मतदार

DCC Bank satara

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. जिल्हा बॅंकेसाठी अंतिम मतदारांची संख्या 1 हजार 964 झाली आहे. मतदार यादी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक कार्यालय, जिल्हा बँक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लावण्यात आली आहे. सातारा जिल्हा बँकेसाठी गत महिन्यात मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर यादीवर हरकती घेतल्यानंतर दि. 27 रोजी … Read more

जि.प. अध्यक्ष उदय कबुले भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांच्या भेटीने, राजकीय चर्चांना उधाण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी आज भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदीर पॅलेस येथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांची झालेली भेट विकासकामांवर आधारित असल्याचे बोलले जात असले तरी या भेटीमागे जिल्हा बँकेचे काही समीकरण दडले आहे का? अश्या चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या … Read more