पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक एकमेव पर्याय नाही – लेफ्टनंट जनरल व्ही.जी.पाटणकर

lt genaral V. G. Patankar

पुणे प्रतिनिधी |अजय नेमाने  चौदा फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला चढवला आणि ३८ जवानांना आपला प्राण गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत असताना, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी होत आहे. त्यावर माजी लेफ्टनंट जनरल व्ही. जी. पाटणकर यांनी आज टिप्पणी केली. ते म्हणाले दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा एकमेव पर्याय नसून लष्करांकडे … Read more

भारताला पाक कडून ही धमकी ..

Untitled design

कराची | ‘पुरावे दिले तर आम्ही कारवाई करू, हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊ’, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जावं शाहिद झाले. यानंतर पाकिस्तानवर जगभरातून टीका सुरु होती; यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली. भारत सरकार कोणत्याही पुराव्याविना पाकिस्तानवर आरोप करीत आहे.पाकिस्तान असे का करेल, आम्हाला याचा … Read more

SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांची भरती होणार

Para military force

पोटापाण्याची गोष्ट | SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांपेक्षा जास्त पदावर भरती होणार असून ती प्रक्रिया चालू झाली आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा ११ फेब्रुवारी पासून ११ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) ७६,५७८ जागा भरण्यासाठी मोठे भरती अभियान चालू केले आहे. ज्यामध्ये ७,६४६ पदे महिलांसाठी राखीव आहेत. … Read more

बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी CISF मध्ये ४२९ जागांची भरती

cisf

पोटापाण्याची गोष्ट | बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असलेल्या पुरुष आणि महिला दोघांसाठीही सीआयएसएफ (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल होण्याची मोठी संधी आहे. भारत सरकारच्या ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’त हेड कॉन्स्टेबल साठी नुकतीच जाहिरात निघाली, त्याद्वारे एकूण ४२९ पदांसाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१९ आहे. हेड कॉन्स्टेबल … Read more

ऑस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडलाही बदडले, एकदिवसीय मालिका ४-१ ने खिशात

MS Dhoni

क्रीडानगरी | पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवला. २५४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४४.१ षटकात २१७ धावांवर गारद झाला. भारतातर्फे अंबाती रायुडू याने ९० तर हार्दिक पांड्या व विजय शंकर यांनी ४५ धावांच्या खेळ्या साकारल्या. भारताच्या डावाची सुरवात खराब झाली होती. अवघ्या २० धावांत ४ विकेट गमावल्यानंतर अंबाती रायुडू … Read more

भारतीय लोक महिलांच्या सन्मानाविषयी फक्त बोलतात, कृती दिसतंच नाही – पी.व्ही.सिंधू

PV sindhu

वृत्तसंस्था | रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केलेल्या पी.व्ही.सिंधूने आज भारतीय लोकांविषयीच आपलं मत व्यक्त केलं. भारतीय लोक सभांमध्ये खूप गप्पा मारताना दिसतात. कौटुंबिक चर्चेवेळी सुद्धा स्त्रियांच्या वागणुकीविषयी काळजी व्यक्त करतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र जो सन्मान त्यांनी स्त्रियांना द्यायला हवा तो कधीच देत नाहीत. इतर देशांमधील लोकांमध्ये महिलांच्या प्रति असणारा सन्मान मी स्वतः पाहिला आहे, त्यामुळे … Read more

भारताकडून दुर्मिळ अशा हायसिस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

images

श्रीहरीकोटा | इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ३१ उपग्रह अवकाशात सोडून मोठी झेप घेतली. इस्रो ने दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी सकाळी ९:५८ वाजता पीएसएलव्ही ४३ प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी ३१ उपग्रह आंध्र प्रदेश श्रीहरीकोटा येथील सतीश धवन तळावरून सोडण्यात आले. या ३१ उपग्रहामध्ये सर्वाधिक उपग्रह अमेरिकेचे होते. तर भारताच्या ‘ हायसिस ‘ या दुर्मिळ उपग्रहाचा … Read more

आशियाई पुरुष कबड्डीतील भारतीय सुवर्णपर्वाची अखेर

Iran

जकार्ता | उपांत्य फेरीत इराणकडून अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागल्याने भारतीय पुरुष कबड्डी संघाच्या सुवर्णपदक मिळवण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. १८ व्या आशियाई स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात इराणने भारताचा २७-१८ असा पराभव केला. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारत पहिल्यांदाच अंतिम सामना खेळू शकणार नाही. पूर्वार्धात ११-१० ने आघाडीवर असणारा भारतीय संघ उत्तरार्धात मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरला. आता … Read more

कुलभूषण यांच्यावरील सुनावणी फेब्रुवारी २०१९ मध्ये

Kulbhushan

आंतरराष्ट्रीय न्यायालय ऐकून घेणार दोन्ही देशांची भूमिका हेग, नेदरलँड्स|पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील सुनावणी फेब्रुवारीमध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विनंतीला मान्यता देऊन लवकर सुनावणी घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने होकार दर्शविला असून १९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ही सुनावणी होईल. कुलभूषण यांच्या आई व पत्नीने लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप पाकिस्तानने … Read more