कराडला तहसीलदार कार्यालयाचा “सेवा रथ” गावागावात

कराड | सेवा पंधरवडा या योजनेअंतर्गत, महसूल विभागामार्फत सेवा रथ सुरू करण्यात आला. या रथाची सुरूवात उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते करण्यात आली. कराड तहसील कार्यालयात तसेच तालुक्यातील प्रत्येक मंडलात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. महसूल विभागातील विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थीना देण्यात आला. त्या अनुषंगाने आज शुक्रवार दि. ३० रोजी … Read more

वाठारच्या मुकादम विद्यालयात देणगीदारांचा सत्कार

कराड | दानशूर बंडो गोपाळा मुकादम विद्यालय व वसंतराव उर्फ डी. के. पाटील ज्युनिअर कॉलेज वाठार येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्य इमारतीवरील काम पूर्ण करण्यासाठी मदत केलेल्या थोर देणगीदारांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था सहसचिव (माध्य.) राजेंद्र साळुंखे व कार्यक्रमाचे प्रमुख … Read more

महाविकास आघाडीच्या नियोजनामुळे उच्चांकी एफआरपी दिली : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कारखाना वेळेत सुरू करून ऊस वेळेत गाळप करण्याचे नियोजन असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी राज्यात ऊसाचे प्रमाण जास्त असताना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या नियोजनामुळे राज्यातील ऊस वेळेत गाळप झाला. तसेच पहिल्यादांच 98 टक्के पेक्षा जास्त एफआरपी … Read more

कराडच्या छत्रपती संभाजी स्मारकास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

कराड | कराडच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास लाभलेला आहे. कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा असून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, स्मारक कराडमध्ये व्हावा, अशी कराडवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करून आपल्या मार्गदर्शन व अनमोल सहकार्याने कराडमध्ये … Read more

तुम्ही केवळ ब्राह्मणांचे मुख्यमंत्री आहात का? असं भाऊराव पाटील भर सभेत म्हणाले अन वातावरण तापलं

karmaveer bhaurav patil

कर्मवीर जयंती विशेष । रयत शिक्षण संस्था सुरु करून ज्यांनी बहुजनांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला अशा कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurav Patil) यांची आज १३५ वी जयंती आहे. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले गावात सत्यशोधक समाजाच्या परिषदेत बहुजनांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला अन रयतची स्थापना झाली. त्यानंतर … Read more

रामदास कदमांचा शिवसेनेकडून “हरामदास” उल्लेख करत निषेध

कराड | शिवसेना कराड दक्षिण तालुक्याच्या वतीने “हरामदास” असा उल्लेख करीत रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला. शहरातील दत्त चाैक येथे शिवसेनेच्या वतीने “जोडे मारो” आंदोलन करण्यात आले. रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व ठाकरे कुटुंबीयांवर जे बेलगाम, बेताल अशोभनीय वक्तव्य केले होते. शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने दत्त … Read more

कराडला भव्य बाईक रॅली : सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेची मागणी

कराड | अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन, योजना लागू करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विद्यानगर येथील वेणूताई चव्हाण काॅलेज ते तहसीलदार कचेरी अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी तहसीलदार विजय पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे पावसाळी … Read more

सह्याद्री व कृष्णा कारखान्यांनी थकित FRP त्वरित दया, अन्यथा आंदोलन : सचिन नलवडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्री व कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील उसाची थकित एफआरपी शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात द्यावी. अन्यथा रयत क्रांति संघटनेच्या वतीने दोन्ही कारखान्यावरती तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रयत क्रांति संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. जेष्ठ नेते सुदाम चव्हाण, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, योगेश झांम्बरे … Read more

कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सर उपचारांसाठी दिलेल्या योगदानाची जागतिक पातळीवर दखल

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ संलग्न कृष्णा हॉस्पिटलने कॅन्सरग्रस्त रुग्णांवरील उपचारांसाठी दिलेल्या उत्तुंग योगदानाची दखल घेत, ‘युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी’ या संस्थेने कृष्णा अभिमत विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आले. पॅरिस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘इस्मो काँग्रेस २०२२’ या जागतिक परिषदेत पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. स्टेन कासा (नॉर्वे) व … Read more

राज्यातून 2 लाख युवकांचे डिग्री सर्टिफिकेट मोदींना पाठवणार – शिवराज मोरे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसने कराड शहरातील रस्त्यावर उतरत आंदोलन केले. २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा करणाऱ्या मोदींनी महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग जर गुजरातला पळवले तर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांनी करायचं काय ? त्यापेक्षा आम्ही अभ्यास करून मिळविलेले डिग्री सर्टिफिकेट तुम्हालाच पाठवून देतो असे परखड वक्तव्य यावेळी … Read more