भंडारकवठे खून प्रकरण; आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलांनी काढला काटा

दारू पिऊन आपल्या आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलांनीच कु-हाड आणि विळयाने गळा कापून आपल्या वडिलांचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पत्नी आणि दोन मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सिल्लोडमधील ‘त्या’ खुनाचा ७ महिन्यानंतर लागला तपास; १ लाखाच्या मुद्देमालासह तिघांना अटक

सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात वाईन शॉपवर हल्ला करण्यात आला होता. यात मॅनेजर भिकन निळूबा जाधव व त्याचा सहकारी लक्ष्मण पुंजाजी मोरे या दोघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडील 4 लाखांची रोख रक्कम घेऊन अज्ञात आरोपींनी पळ काढला होता. यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

भाच्याच्या खूनप्रकरणी मामाला जन्मठेपेची शिक्षा; जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला निकाल

दारू आणण्यासाठी नकार देणार्‍या गणेश वाल्मिकी या मावस भाच्याला गळफास लावून खून केल्याप्रकरणी मामा गणेश हणमंतप्पा तळवार याला दोषी धरून जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी आज हा निकाल दिला.

जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत मुलाने केला निर्घृण खून

जिल्हयातील खटाव तालुक्यातील मोराळे गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरण शहाजी शिंदे असं वडूज पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर कांताबाई शहाजी शिंदे असं मयत महिलेचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून मुलगा किरण याने आपली आई कांताबाई हिच्याशी वाद घालत हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

कळमनुरीमध्ये हुंड्याच्या लोभाने जावयाने केली मेव्हण्याची निर्घृण हत्या

कळमनुरी तालुक्यातील लासिना येथे हुंड्याच्या रकमेच्या वादातून जावयाने आपल्या सख्ख्या मेव्हण्याचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतोष शंकर डांगे (१४) असं मयत मेव्हण्याचे नाव असून तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी असं आरोपी जावयाचं नाव आहे.

पुतण्याने केला चुलत्याचा निर्घृण खून, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

जत तालुक्यातील जालीहाळ बुद्रुक येथे शेतजमिनीचा वादातून पुतण्यानीच चुलत्याचा दगडांनी ठेचून खून केल्याची खळबळ घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महादेव पुजारी असे खून झालेल्या व्यक्तीच नाव आहे.

धक्कादायक! माहेरून पैसे न आणल्याने सासरच्यांनी सुनेसह २ मुलांचा खून करून विहिरीत टाकले

माहेरून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये न आणल्यामुळे एका विवाहितेला तिच्या दोन मुलांना ठार मारून तीने आत्महत्या केल्याचे भासविणाऱ्या सासरच्या मंडळीवर कंधार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गोणार येथे रविवारी १ डिसेंबर सायंकाळी घडली. घटना घडल्यासून सासरची मंडळी फरार असून त्यांना जोपर्यंत अटक करणार नाहीत. तोपर्यंत तिन्हीही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांना दिला आहे. सध्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. विहिरीत टाकणाऱ्या पतीसह पाच जनावर कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिर्डी-लोणीत झालेल्या गोळीबारामध्ये युवकाचा मृत्यू

शिर्डी जवळच्या लोणी गावात शाब्दिक चकमकीतून झालेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला. आर्थिक देवाण घेवाण मधून घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. घटनास्थळावरुन गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

कन्नड तालुक्यात तरुणीचा मृतदेह आढळला, बलात्कार करून खून केल्याचा संशय

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असणाऱ्या आठेगाव येथे १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारातील शेतात आढळून आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा खून करण्यात आला, की बलात्कार करून तिला मारण्यात आले, हे अजून स्पष्ट झालं नाही.

‘या’ कारणामुळे जिवलग मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या

विकलेल्या स्कुटीच्या पैशावरून झालेल्या वादानंतर एका मैत्रिणीनेच मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सेंट्रल नाका परिसरातील आलंतमश कॉलोनी भागात घडली. विद्या चंद्रकांत तळेकर असे मृत महिलेचे नाव आहे तर शकीला उर्फ निलोफर शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.