सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार; संजय राऊत यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकस आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार संजय राऊत यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली … Read more

कितीही विरोध करा, CAA परत घेतला जाणार नाही; अमित शहांनी विरोधकांना सुनावले

लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात उठलेलं वादळ अजून शांत व्हायला तयार नाही. या कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना भाजपने या कायद्याच्या समर्थनार्थ सभा, रॅली सुरू केल्या आहेत. लखनऊ येथे CAA च्या समर्थनार्थ बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली. त्यांनी म्हंटले की, ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी करावा पण मी … Read more

तुमचे आधारकार्ड हरवलंय? काळजी करू नका; 15 दिवसात घरपोच मिळेल, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : तुमचे आधारकार्ड हरवले असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण आता यूआयडीएआयने आधार अ‍ॅपचे नवीन व्हर्जन बाजारात आणले आहे. या नवीन अ‍ॅपचे नाव mAadhaar आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड किंवा आयओएस वापरकर्ते सहजपणे डाउनलोड करू शकतील. हे अ‍ॅप Apple आणि अँड्रॉइड प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येते. या अ‍ॅपच्या मदतीने आपण सहजपणे … Read more

राखी सावंत झाली भावनिक, म्हणाली, फेकलेले अन्न खात आम्ही वाढलो, पहा व्हिडीओ

टीम हॅलो महाराष्ट्र : अभिनेत्री राखी सावंत वादग्रस्त विधाने, हटके ऍक्शन आणि बिन्धास्त बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या वागण्याची सोशलमिडीयावर मनसोक्त खिल्ली उडवली जाते. बिंधास्त असणाऱ्या राखीच एका शोमध्ये गंभीर आणि भावनिक रूप पहायला मिळालं. राजीव खंडेलवालच्या ‘जज्बात’ शोमध्ये राखी सावंतला तिच्या लहानपणाविषयी विचारण्यात आलं. त्यावेळेस बोलताना राखी भावनिक झाली आणि तिचे डोळे पाणावले. या … Read more

मी बुमराहसारखी बॉलिंग करू शकतो; आम्हाला व्हिडीओ पुरावा हवा – ICC

बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बेंगळुरू येथे तिसरा आणि अखरेचा सामना सुरु आहे. या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅमेऱ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच हटके प्रयोग करत आले आहेत. अशाच क्रिएटिव्ह प्रेक्षकाने हातात धरलेल्या पोस्टरने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. मी जसप्रीत बुमराहसारखी बॉलिंग करू शकतो या अर्थाचे ते पोस्टर … Read more

संजय राऊत यांनी ‘तसं’ बोलायला नको होतं – शरद पवार

टीम हॅलो महाराष्ट्र, नाशिक : शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंदिरा गांधी विषयी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी म्हंटले की, संजय राऊत यांनी केलेल्या विधानापासून दूर आहे. मला त्या वादात पडायच नाही. पण इंदिरा गांधी यांच्याविषयी त्यांनी तसं बोलायला नको होतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली … Read more

कर्नाटकी दहशतवादाचा महाराष्ट्र भाजप निषेध करेल काय? संजय राऊत उद्या बेळगाव दौऱ्यावर

टीम हॅलो महाराष्ट्र : बेळगाव सीमा प्रश्नी लढताना हौताम्य पत्करलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून रोखण्यात आले. तसेच कर्नाटक पोलिसांकडून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना धक्काबुकी करण्यात आली. या प्रकरणी संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा निषेध करेल काय, असा प्रश्न संजय राऊत यांनी … Read more

संभाजी भिडे यांचे उद्या सांगली बंदचे आवाहन; संजय राऊतांना पदावरून हटवण्याची मागणी

सांगली | उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद सातारा, सांगली भागात पडताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली बंदचं आवाहन केलं आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर … Read more

इंदिरा गांधींविषयीच्या ‘त्या’ दाव्यावरून संजय राऊत यांचा युटर्न, मागितली माफी

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर केलेले वादग्रस्त विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागे घेतले आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या विधानामुळे कुणाला दुखावले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कॉंग्रेस नेत्यांना नेहमीच पाठिंबा देत आलो आहे. कॉंग्रेसच्या आक्षेपावर संजय राऊत म्हणाले, ‘मी नेहमी इंदिरा गांधी, पंडित नेहरू, राजीव गांधी आणि गांधी परिवाराबद्दल आदर दाखवला … Read more

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीचे चित्र नोटांवर छापा; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा सरकारला सल्ला

टीम हॅलो महाराष्ट्र : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटांवर लक्ष्मीचे चित्र छापले पाहिजे, असा अजब सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी सरकारला सांगितला आहे. मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात ते पत्रकारांशी बोलत होते. इंडोनेशियातील नोटांवर भगवान गणेशचा पुतळा छापल्याच्या बातमीविषयी पत्रकारांनी विचारले असता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले की, ‘मी म्हणतो की आपल्या नोटांवर … Read more